Join us  

IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स संघातील इंग्लंडच्या मॅच विनर खेळाडूने घेतली माघार; २ कोटींचा झाला फायदा

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आदी संघांनी त्यांच्या ताफ्यातील काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:53 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीने वेग पकडला आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आदी संघांनी त्यांच्या ताफ्यातील काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २३ डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी अधिकाधिक पैसे आपल्या पर्समध्ये रहावेत यासाठी फ्रँचायझी खेळाडूंना रिलीज करत आहेत. अशात KKR संघातील इंग्लंडचा स्फोटक फलंदाज सॅम बिलिंग्स ( Sam Billings) याने आयपीएल २०२३मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बिलिंग्सने आयपीएलमध्ये ३० सामन्यांत ३ अर्धशतकांसह ५०३ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्सने २०१६मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स ( दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पणकेले. त्याने त्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ५४ धावांची खेळी केली होती. २०२२मध्ये तो कोलकाताच्या ताफ्यात दाखल झाला. २०१६नंतर स२म चेन्नई सुपर किंग्स ( २०१८) कडूनही खेळला. बिलिंग्सने इंग्लंड क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आणि KKRचे २ कोटी रुपये वाचले आहेत. 

कोलकाताने रिटेन केलेले खेळाडू - श्रेयस अय्यर, सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, पॅट कमिन्स, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, रिंकू सिंग, उमेश यादव 

रिलीज केलेले खेळाडू - शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, आरोन फिंच 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सइंग्लंड
Open in App