Join us  

Brian Lara नंतर 'या' फलंदाजांने कुटल्या ४०० धावा, ठरली शतकातील सर्वोत्तम धावसंख्या

सॅमने लगावले तब्बल ४५ चौकार, लाराचा विक्रमही मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 10:27 PM

Open in App

Sam Northeast Brian Lara: विंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये ४०० धावा करत विश्वविक्रम केल्याचे सर्वांनाच माहिती आहे. असा विक्रम इतर कोणीही करणं खूप कठीण आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नसले तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र लाराच्या एलिट क्लबमध्ये एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली. सॅम नॉर्थईस्ट याने शनिवारी इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात ग्लॅमॉर्गन कडून नाबाद ४१० धावा केल्या. त्यामुळे या शतकातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत त्याने लाराला मागे टाकले.

लारापेक्षाही जास्त धावा करत ठरला सर्वोत्तम

एका डावात ४०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या एलिट गटात तो सामील झाला. सॅम नॉर्थइस्ट याला ब्रायन लाराच्या ५०१ या जागतिक विक्रमी वैयक्तिक धावसंख्येला आव्हान देण्याची संधी मिळाली नाही. कारण ग्लॅमॉर्गनने लीसेस्टरशायर विरुद्ध ५ बाद ७९५ धावांवर डाव घोषित केल्या. ब्रायन लाराने १९९४ साली इंग्लिश काऊंटी क्रिकेट सामन्यात वॉर्विकशायर कडून खेळताना केले होते. नॉर्थईस्टने त्याच्या खेळीदरम्यान ४५० चेंडूंचा सामना केला. त्याने ४५ चौकार आणि तीन षटकार ठोकले. एलिट लेव्हल क्रिकेटमधील या शतकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ब्रायन लाराचा २००४ मध्ये इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजकडून नाबाद ४०० धावांचा कसोटी विक्रम होता, तो विक्रम त्याने मागे टाकला.

--

सर्वकालीन खेळींमध्येही नववा खेळाडू

नॉर्थईस्टची खेळी सर्वकालीन सर्वोच्च धावसंख्येमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या आधी केवळ आठ खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. लाराप्रमाणेच ऑस्ट्रेलियन फलंदाज बिल पॉन्सफोर्डने दोन वेळा ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता. नॉर्थइस्टचा डाव हा लाराच्या खेळीनंतर इंग्लिश काऊंटी सामन्यातील ४०० हून अधिक धावांची चौथी सर्वोत्तम धावसंख्या आहे. आर्ची मॅक्लारेन (४२४ धावा) १८९५ मध्ये आणि ग्रॅम हिकने (४०५ धावा) यांनी १९८८ मध्ये हा पराक्रम केला होता.

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिपइंग्लंड
Open in App