Join us  

स्मृती, मोना, पूनम यांना प्रत्येकी ५० लाख

महाराष्ट्रतील खेळाडू स्मृती मानधना, मोना मेश्राम आणि पूनम राऊत यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येकी ५० लाखांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 3:34 AM

Open in App

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय संघाच्या महाराष्ट्रतील खेळाडू स्मृती मानधना, मोना मेश्राम आणि पूनम राऊत यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येकी ५० लाखांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी या तिन्ही खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात गौरव केला.महिला क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘या खळे ाडृंूच्या शानदार कामगिरीमळु ेभारताच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय संघाला अवघ्या नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला तरी लोकांची मनेजिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय संघात सहभागी असलेल्या स्मृती मानधना, मोना मेश्राम आणिपूनम राऊत यांना राज्य सरकार प्रत्येकी ५० लाखांचा रोख पुरस्कार देईल.गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे महिला क्रिकेट संघासाठी मेजवानीचे आयोजन केले होते. मोदी यांनी देशाचा गौरववाढविल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.मुंबई क्रिकेट संघटनेनेदेखील (एमसीए) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणाºया भारतीय संघातील सदस्य पूनम राऊत, स्मृती मानधना आणि मोना मेश्राम यांना शुक्रवारी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे एमसीएने या तीन खेळाडूंना एमसीएबीकेसी मैदानाची सदस्यतादेखीलदिली. मुंबईच्या पूनम राऊतने अंतिमसामन्यात ८६ धावांची खेळी केलीहोती. एमसीए या तीन खेळाडूंना १३आॅगस्ट रोजी सन्मानित करणार आहे.