Join us  

दहावर्षांपूर्वी याच दिवशी युवराजने इंग्लंडच्या 'या' गोलंदाजाची काढली होती हवा

खराब फॉर्ममुळे युवराज सिंग आज भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी झगडत असला तरी, एकवेळ अशी होती की, युवराजच्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरायची.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 12:39 PM

Open in App
ठळक मुद्दे19 सप्टेंबर 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबनच्या किंग्समीड मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरु होता. भारताच्या 3 बाद 171 धावा झाल्या होत्या. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 19 वे षटक टाकण्यासाठी आला.

नवी दिल्ली, दि. 19 - खराब फॉर्ममुळे युवराज सिंग आज भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी झगडत असला तरी, एकवेळ अशी होती की, युवराजच्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरायची. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड त्याचे उत्तम उदहारण आहे. बरोबर 10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने युवराजच्या बॅटचा तडाखा अनुभवला होता. 

19 सप्टेंबर 2007 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबनच्या किंग्समीड मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरु होता. 18 षटकात भारताच्या 3 बाद 171 धावा झाल्या होत्या. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 19 वे षटक टाकण्यासाठी आला. समोर स्ट्राईकवर युवराज सिंग होता. हे षटक सुरु होण्याआधी युवराजची इंग्लंडच्या अँड्रयू फ्लिंटऑफ बरोबर शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्यामुळे मैदानावरील वातावरण तापलेले होते. फ्लिंटॉफच्या दिशेने जाणा-या युवराजला पंचांनी रोखले होते. 

स्टुअर्ट ब्रॉडचे 19 वे षटक सुरु झाले आणि क्रिकेटच्या मैदानावर एक नवा इतिहास रचला गेला. युवराजने ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले. मैदानावर असे काही घडले याची कुणीही कल्पना केली नव्हती.  एका षटकात सहा षटकार ठोकणारा युवराज  जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. या सहा षटकारांच्या विक्रमांसंबंधी बोलताना युवराज म्हणाला की, आता या गोष्टीला दहावर्ष झाली असली तरी, मला आजही तरुण असल्यासारखे वाटते. त्या दिवसाच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्य आहेत. 

त्या सामन्याआधी मी पुरेशा धावा करत नसल्याने माझ्यावर टीका सुरु होती. तसेच काही महिने आधी 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतच आमचे आव्हान संपुष्टात आले होते असे युवराजने सांगितले. सहा षटकार मारण्याआधी काही ठरवले नव्हते. मी फक्त बॉलच्या गुणवत्तेनुसार फटकेबाजी केली असे युवराजने सांगितले. ट्वेंटी-टवेंटी क्रिकेटमधील हा पहिलाच वर्ल्डकप होता. अंतिम फेरीत पाकिस्तानला नमवून भारताने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. 

युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला मिळालेलं 'गॉड गिफ्ट' राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज युवराज सिंगचं कौतुक करताना युवराज सिंग म्हणजे भारतीय संघाला मिळालेलं गॉड गिफ्ट असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र 2019 वर्ल्ड कप खेळायचा असेल तर युवराज सिंगसाठी फिटनेस तितकाच महत्वाचा आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. युवराज सिंह भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :क्रिकेट