दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध शनिवारी बेंगळुरूमध्ये आरसीबी संघाला मिळालेल्या विजयाचे महत्त्व सांगणे कठीण आहे. आम्ही गृहमैदानावर पुन्हा पराभूत होण्यास इच्छुक नव्हतो. आपल्या सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी चार गमावित तालिकेत सर्वांत तळाच्या स्थानावर जाण्याची आमची इच्छा नव्हती. क्रिकेट जाणकारांना आरसीबी संघ लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि क्षमतेच्या तुलनेत कमकुवत कामगिरी करीत आहे, असे बोलण्याची संधी मिळावी, असे आम्हाला वाटत नव्हते.
जर आम्ही १७५ धावांचे अपेक्षेपेक्षा कमी लक्ष्य गाठण्यात आणि विजय मिळवित तालिकेतील स्थानामध्ये थोडी सुधारणा करण्यात अपयशी ठरलो असतो तर सर्व शक्ती व सर्व आशा मावळल्या असत्या. स्पर्धेचा सुरुवातीचा टप्पा असला तरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी शानदार व्यक्ती आहे. दिल्लीविरुद्धच्या लढतीच्या एका दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला सल्ला दिला की, संघाने एकत्र होऊन २००४ मध्ये प्रदर्शित झालेला प्रसिद्ध अमेरिकन लीग चॅम्पियनशिप सिरिजचा चित्रपट बघायला हवा. त्यात बोस्टन रेड सॉक्स न्यूयॉर्क यंकिसविरुद्ध ०-३ ने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करीत ४-३ ने विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो.
रेड सॉक्सचा यशाचा मंत्र असतो की, आम्हाला एकही सामना जिंकू देऊ नका. कारण आम्हाला एक सामना जिंकू दिला तर हा विजय आमचा आत्मविश्वास उंचावण्यास पुरेसा ठरेल आणि आम्हाला आमच्या क्षमतेचीही कल्पना येईल. त्यानंतर आम्हाला महत्त्वाची असलेली लय गवसेल आणि एकाएकी ज्या संघाला बघून वाटत होते की जिंकू शकत नाही त्याच संघाला नंतर बघून असे वाटते की हा संघ पराभूत होऊ शकत नाही.
व्हेटोरीचा हा प्रेरणादायी सल्ला होता. त्यानंतर आम्ही सर्वांनी रेड सॉक्स चित्रपट बघितला. दरम्यान, आम्ही दिल्लीला १५ व्या षटकापर्यंत जखडून ठवले होते, पण अखेरच्या षटाकांत बऱ्याच धावा बहाल केल्या. विराट कोहलीने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करत संघाला लक्ष्य गाठून दिल्यामुळे मीसुद्ध खूश आहे. फलंदाजीदरम्यान माझ्या डोक्यात तेच शब्द रुंजी घालत होते की, आम्हाला एकही सामना जिंकू देऊ नका. कारण त्यानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही काय करू शकतो. आरसीबी संघ जेतेपद पटकावणारच, हा दावा मी करीत नाही. कारण चेन्नईविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणारी लढत चुरशीची राहणार आहे, पण आता आम्ही शर्यतीत आहोत. (टीसीएम)
Web Title: The same words were kept in mind!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.