नवी दिल्ली : श्रीलंकेचा तडफदार माजी सलामीवीर सनथ जयसूर्यावर आयसीसीने भ्रष्टाचाराचे दोन आरोप केले आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने जयसुर्यावर गंभीर आरोप केले असून त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी 14 दिवसांची मुदत दिली आहे.
आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक जयसूर्याची चौकशी करायला गेले होते. त्यावेळी जयसूर्या श्रीलंकेच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. त्यावेळी जयसूर्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला चांगली वागणूक दिली नव्हती. त्यांच्या कारवाईमध्ये बाधा आणण्याचे काम जयसूर्या करत होता. त्यामुळे आयसीसीच्या 2.4.6 या कलमानुसार जयसूर्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाला मदत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.7 नुसार कारवाईमध्ये बाधा आणण्याचा आरोप केला आहे.