कोलंबो - भारताच्या 19 वर्षांखालील संघातील खेळाडू पवन शाहने श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात 282 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी भारताच्या तन्यम श्रीवास्तवच्या (220) नावावर हा विक्रम होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पवनने दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पीइकच्या (नाबाद304) नावावर सर्वाधिक धावा आहेत.
(भारताच्या ' या 'युवा फलंदाजाने रचला विक्रम)
हम्बनटोटा येथे सुरू असलेल्या या कसोटीत महाराष्ट्राच्या पवनने 332 चेंडूंत 33 चौकार आणि 1 षटकार खेचला. विशेष बाब म्हणजे त्याने या मॅरेथॉन खेळीत चौकारच अधिक लगावले आहेत. यासह त्याने केकेवी परेराच्या षटकात सलग चार चौकार मारून 36 वर्षांपूर्वी संदीप पाटील यांच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली.
पाटील यांनी 1982च्या मँचेस्टर येथे इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटीत नाबाद 129 धावा केल्या होत्या. त्यात त्यांनी जलदगती गोलंदाज बॉब विलिसच्या एका षटकात सहा चौकार लगावले होते. त्यानंतर तीन फलंदाजांना कसोटीत अशी कामगिरी करता आली आहे. ख्रिस गेल ( 2004), रामनरेश सारवान (2006) आणि सनथ जयसूर्या (2007) यांनी अशी कामगिरी केली आहे. वन डेत तिलकरत्ने दिलशानने ( 2015) आणि आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेने ( 2012) असा खेळ केला आहे.
Web Title: Sandeep Patil's 36 year old record repeated by pawan shah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.