Join us  

Sania Mirza : सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही; टेनिस स्टारवर भडकले नेटिझन्स 

याही सामन्यात सानिया मिर्झा पती शोएब मलिका याला चिअर करण्यासाठी पोहोचली होती आणि तिला पाकिस्तानसाठी टाळ्या वाजवताना पाहून नेटिझन्स भडकले अन् तिला ट्रोल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:09 AM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. २००९ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५चा वन डे वर्ल्ड कप आणि आता २०२१चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदासाठी हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. पण, या सामन्यात नेटिझन्सकडून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ( Sania Mirza) हिला ट्रोल केलं जात आहे.

पाकिस्तानकडून बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या. 

ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. मॅथ्यू वेड  व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला.   शाहिननं १९वे षटक फेकले.  शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 

याही सामन्यात सानिया मिर्झा पती शोएब मलिका याला चिअर करण्यासाठी पोहोचली होती आणि तिला पाकिस्तानसाठी टाळ्या वाजवताना पाहून नेटिझन्स भडकले अन् तिला ट्रोल केले.     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानआॅस्ट्रेलियासानिया मिर्झा
Open in App