लाहोर : शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाहबद्ध झाला. हसन अलीनं हरयाणा येथील मेवात जिल्ह्यातील शामिया आरझूशी विवाह केला. दुबईतील अटलांटा पाल्म हॉटेलमध्ये 20 ऑगस्टला शामिया आणि हसन विवाहबंधनात अडकले. या नव दाम्पत्याचा भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा व पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी पाहुणचार केला.
शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून शामिया दुबईतच स्थायिक आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात. पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबद्ध होणारी शामिया ही तिसरी भारतीय मुलगी आहे. यापूर्वी झाहीर अब्बास, मोहसीन खान, शोएब मलिक यांनी भारतीय महिलांशी विवाह केला आहे. हसननं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं चार सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या होत्या, पण 38 षटकांत त्यानं 256 धावा दिल्या. हसननं आतापर्यंत 53 वन डे आणि नऊ कसोटी सामन्यांत एकूण 88 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 35 विकेट्स आहेत.
वाघा बॉर्डरवर केली होती 'कार्टून'गिरीइंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा ट्रेनिंग कॅम्प सुरू होता. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी संघाला वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असतानाच अचानक हसन अलीनं विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. बळी मिळवल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून करत होता. यानंतर हसन अलीला भारतीयांनी असं संबोधलं होते.
Web Title: Sania Mirza, Shoaib Malik host newlyweds Hasan Ali and Samia Arzoo at Dubai residence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.