पाकिस्तान क्रिकेटमध्ये नुकतीच एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) याचा भाचा मुहम्मद हुराइरा ( Muhammad Huraira ) हा पाकिस्ताकडून त्रिशतक झळकावणारा दुसरा युवा फलंदाज ठरला. त्यानं Quaid-e-Azam Trophyया स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात त्रिशतक झळकावले. तो १९ वर्ष व २३९ दिवसांचा आहे. त्रिशतक झळकावणाऱ्या युवा पाकिस्तानी फलंदाजाचा मान जावेद मियाँदाद यांनी १९७५ मध्ये पटकावला होता. त्यांनी १७ वर्ष व ३१० दिवसांचे असताना कराची व्हाईट संघाकडून नॅशनल बँकविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती.
मुहम्मद हा पाकिस्तानकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसरा युवा फलंदाज ठरला, तर त्रिशतक नावावर असलेला ८वा पाकिस्तानी खेळाडू ठरला. पाकिस्तानी मैदानावरील हे २३वे त्रिशतक ठरलं. या फलंदाजांमध्ये माईक ब्रेर्ली, मार्क टेलर आणि वीरेंद्र सेहवाग या नावांचाही समावेश आहे. मुहम्मद म्हणाला,''शोएब मलिक हे माझे काका आहेत, हे मी माझं भाग्य समजतो. ते नेहमीच माझ्या प्रेरणास्थानी आहेत. त्यांनी नेहमी मला प्रोत्साहन दिल आणि क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट वापरू नकोस, मेहनत घे हा सल्ला दिला.''
मुहम्मदनं ३४१ चेंडूंत ४० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३११ धावा केल्या. तो पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाचाही सदस्य होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्य़े त्रिशतक करणारा मुहम्मद हा जगातील ९वा युवा फलंदाज ठरला.
शोएब मलिकनं ट्विट केलं की, ''मला तुझा अभिमान वाटतो. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी मेहनत सुरूच ठेव. तुला शुभेच्छा.''
Web Title: Sania Mirza -Shoaib Malik’s nephew Muhammad Huraira becomes second-youngest Pakistani to hit a FC triple ton
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.