Join us  

शोएबच्या तिसऱ्या लग्नावर सानियाच्या वडिलांची प्रतिक्रिया, लेकीनं 'खुला' घेतली; म्हणजे... 

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने शनिवारी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत कराचीमध्ये तिसरे लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 2:59 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने शनिवारी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत कराचीमध्ये तिसरे लग्न केले आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेत्रीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.  सानिया व शोएब यांना एक मुलगा आहे आणि ५ वर्षांचा इझान भारतीय टेनिसपटूसोबत राहतो.

सानियापूर्वी एका भारतीय मुलीसोबत Shoaib Malik ने थाटलेला संसार; कोण आहे आयेशा?

शोएब आणि सानिया यांच्यातील मतभेदांबद्दल २०२२ पासून जोरदार अफवा पसरल्या होत्या आणि ज्यामुळे ते विभक्त झाले आहेत आणि गेल्या काही वर्षांत ते क्वचितच एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी मलिकनेही भारतीय स्टारला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. सानियानेही इंस्टाग्रामवरील शोएबसोबतचे सर्व फोटो डिलिट केले होते. शोएब आणि सानियाने एप्रिल २०१० मध्ये भारतीय खेळाडूच्या मूळ गावी हैदराबादमध्ये लग्न केले होते आणि ते दुबईमध्ये राहत होते.

अनेक सीरियलमध्ये आणि पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सना जावेदने २०२० मध्ये गायक उमेर जैस्वालशी एका साध्या समारंभात लग्न केले होते. पण, दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. भारताच्या महान टेनिसपटूंपैकी एक असलेल्या सानियाने गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली होती. २० वर्षांच्या कारकिर्दीत तिने ४३ WTA दुहेरी विजेतेपद आणि एक एकेरी ट्रॉफी जिंकली. 

शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआयला सांगितले की, ही 'खुला' होती, जी मुस्लिम महिलेच्या तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट घेण्याच्या अधिकाराचा संदर्भ देते.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झाऑफ द फिल्ड