Join us  

प्रीतीचा संघ रोहित शर्मावर डाव खेळणार का? काय आहे संघाची रणनिती? संजय बांगर म्हणाले...

रोहितसंदर्भातील पंजाब किंग्स संघाच्या रणनितीवर काय म्हणाले संजय बांगर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 3:36 PM

Open in App

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो गायब होणार असला तरी आयपीएलमध्ये हिटमॅनचा हिट शो पाहायला मिळेल, यात शंका नाही. पाच वेळा मुंबई इंडियन्सला चॅम्पियन केल्यावरही गत हंगामात त्याला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले होते. तेव्हापासून रोहित आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशिवाय दुसऱ्या संघात खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगत आहे.

पंजाब किंग्सरोहित शर्मावर डाव खेळणार?

जर मुंबई इंडियन्सच्या संघाने मेगा लिलावाआधी त्याला रिलीज केले तर लिलावात उतरल्यावर अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी उत्सुक असतील. यात पंजाब किंग्सचाही समावेश असेल. पंजाब किंग्स संघबांधणीचा चेहरा असणाऱ्या संजय बांगर यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.  आरएओ पॉडकास्ट यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीमध्ये संजय बांगर यांना रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. 

सर्वकाही  संघाच्या पर्समधील पैशांवर असेल अवलंबून 

जर रोहित शर्मा लिलावात सामील झाला तर पंजाब किंग्स त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी डाव खेळणार खेळणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना संजय बांगर म्हणाले की, जर रोहित शर्मा लिलावात उतरला तर सहाजिकच त्याच्यावर मोठी बोली लागेल. त्यामुळे लिलावात त्यावेळी पंजाबच्या पर्समध्ये किती पैसे असतील त्यावर सर्वकाही अवलंबून असेल, असे ते म्हणाले आहेत.  

पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोडून दुसऱ्या संघाकडून खेळण्यास तयार आहे का? 

पंजाब किंग्सच्या संघाला आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मेगा लिलावात एक मजबूत संघ बांधणी करण्यासाठी या संघाला एका चांगल्या कॅप्टनचीही गरज असेल. जर रोहित शर्माच्या रुपात त्याने हा चेहरा मिळाला तर हा संघ त्याच्यावर मोठा डाव खेळण्यासही तयार होईल. पण यासर्व गोष्टी या आयपीएलमधील रिलीज-रिटेनचा खेळानंतरच्या आहेत. लवकर बीसीसीआय खेळाडूंच्या रिटेन्शनसंदर्भात नियमावली जाहीर करेल. जर मुंबई इंडियन्सनं रोहितला रिलीज केले. किंवा रोहित या संघापासून वेगळा झाला तर निश्चितच पंजाब किंग्स त्याच्यावर टपून असेल.  

 

टॅग्स :आयपीएल लिलावरोहित शर्मामुंबई इंडियन्सपंजाब किंग्स