भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका होणार आहे. या आधी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळतील. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह वगळता जवळपास सर्वच सक्रिय खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक आजारामुळे या स्पर्धेबाहेर झाले आहेत, तर रवींद्र जडेजा देखील खेळणार नाही. सिराजच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळाली, तर क संघात गौरव यादवने उमरान मलिकची जागा घेतली. दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बंगळुरुतील चिन्नस्वामी स्टेडियमवर सर्व सामने पार पडतील. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्यांना बांगलादेशविरुध्दच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते.
रोहित, विराट आणि बुमराह या त्रिकुटाला या देशांतर्गत स्पर्धेतून विश्रांती दिल्याने भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत ते म्हणाले की, गेल्या ५ वर्षांत भारताने २४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित त्यापैकी फक्त ५९% खेळला आहे. विराट ६१% आणि बुमराह ३४% सामन्यांमध्ये दिसला आहे. मी त्यांना विश्रांती दिलेल्या भारतीय खेळाडूंप्रमाणेच पाहतो. म्हणूनच त्यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड होऊ शकली असती.
दुलीप ट्रॉफीसाठी चार संघ
- अ संघ - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
- ब संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.
- क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, गौरव यादव, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.
- ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.