कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण पदावर कायम राहतील, असे संकेत मिळाले असून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची गच्छंती ठरली आहे. द. आफ्रिकेचा दिग्गज जॉन्टी ºहोड्स याच्यासह अनेक दावेदार असले तरी क्षेत्ररक्षणासाठी श्रीधर यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रीय निवडकर्ते भारतीय संघासाठी सहयोग स्टाफ निवडतील तेव्हा बांगर यांना घरी पाठविले जाण्याची शक्यता आहे. तिघांनाही मुख्य प्रशिक्षक रवी शस्त्रीसोबत वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढीव कालावधी देण्यात आला. त्यानंतर नव्याने मुलाखती होतील व नियुक्ती केली जाईल. निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोलंदाजीत सर्वच प्रकारात चांगली कामगिरी झाल्यामुळे अरुण पदावर कायम राहतील, असे मानले जात आहे.
एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० महिन्यात अरुण यांचे काम चांगले झाले. सध्याचा भारतीय मारा कसोटीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये आहेत. याचे श्रेय अरुण यांना जाते. निवडकर्ते त्यांच्याऐवजी अन्य कुणाला प्राधान्य देण्याची शक्यता नाही.
बांगर मात्र, ४ वर्षे पदावर राहूनही बलाढ्य मधली फळी उभी करू शकले नाहीत. बांगर येण्याआधीपासूनच रोहित व कोहली चांगली कामगिरी करीत होते. मधल्या फळीचे अपयश विश्वचषकात चव्हाट्यावर आले. क्षेत्ररक्षणात मात्र श्रीधर यांना ºहोड्सकडून कडवे आव्हान मिळू शकते. ºहोड्स हे मोठे नाव असल्याने त्याच्याकडे डोळेझाक करता येणार नाही. (वृत्तसंस्था)कपिलदेव यांची समिती निवडणार प्रशिक्षकविश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे. प्रशिक्षक पदासाठी आॅगस्टच्या दुसºया आठवड्यात मुलाखत होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या प्रशासकांच्या बैठकीत(सीओए) हा निर्णय घेण्यात आला. समितीत कपिल यांच्यासह माजी कर्णधार शांता रंगास्वामी, आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे.
बैठकीनंतर सीओए प्रमुख विनोद राय म्हणाले, ‘तीन सदस्यांची समिती नवा प्रशिक्षक निवडणार असून त्यासाठी आॅगस्टच्या दुसºया आठवड्यात मुलाखत होईल. भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौºयाच्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे.’
क्रिकेट सल्लागार समितीचे मूळ सदस्य सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संबंधित दुटप्पी भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा केली जात आहे. दोघे समालोचन करतात शिवाय विविध राज्य संघटनेत कार्यरत आहेत.दोघांना एका कामाची निवड करण्यास सांगण्यात आले. सीएसीलाच मुख्य प्रशिक्षक निवडण्याचा अधिकार असला तरी सचिन, गांगुली व लक्ष्मण यांच्याबाबत ठोस निकाल येण्यास वेळ लागेल. त्यामुळे कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती प्रशिक्षक निवडेल. (वृत्तसंस्था)