संजय बांगर यांना फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन निरोप देणे आश्यर्यचकित करणारे आहे. माजी निवड समिती सदस्य विक्रम राठोड यांना पसंती मिळाल्यामुळे बांगर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सल्लागार समितीने (कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी) रवी शास्त्री यांची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीला सपोर्ट स्टाफच्या (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) निवडीची जबाबदारी सांभाळायची होती. गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना दोन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आले. दरम्यान, बांगर यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये निश्चितच ओळख निर्माण केली आहे.
भारतीय संघ सध्याच्या स्थितीत कसोटी मानांकनामध्ये अव्वल स्थानावर व वन-डेमध्ये दुसºया स्थानी आहे. गेल्या काही वर्षांत संघाने सर्वंच प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्य राखताना चांगली कामगिरी के ली आहे. तरी संघाला वर्ष २०१७ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीतील पराभवाव्यतिरिक्त विश्वकप उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. संघाच्या योगदानात गोलंदाजी व क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण प्रदीर्घ कालावधीपर्यंत जागतिक पातळीवर संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाºया फलंदाजीला विसरता येणार नाही आणि त्यात बांगरची भूमिका महत्त्वाची आहे. नक्कीच भारतीय फलंदाजी कसोटीच्या तुलनेत वन-डेमध्ये जास्त यशस्वी ठरली. वन-डेमध्ये अद्याप फलंदाजी क्रमाबाबत प्रयोगच सुरू आहेत. अशा बाबतीत फलंदाजी प्रशिक्षकापेक्षा महत्त्वाची भूमिका मुख्य प्रशिक्षक व कर्णधाराची असते. मुलाखतीदरम्यान याची चर्चा होती की, विश्वकप उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय बांगरला महागडा ठरेल. ही बाब सत्य आहे, असे मानले तरी या पूर्ण प्रकरणात केवळ एकट्या बांगरला दोषी ठरविता येईल ? कारण अशा निर्णयात प्रशिक्षक व कर्णधारही सक्रिय भूमिका बजावतात.
- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत