Virat Kohli Lunch Chilli Paneer : भारतीय संघातील स्टार बॅटर विराट कोहली जवळपास १३ वर्षांनी रणजी मॅचसाठी मैदानात उतरला आहे. बऱ्याच वर्षांनी तो देशांतर्गत स्पर्धेतील सामना खेळत असल्यामुळे चाहत्यांसाठीही एक पर्वणीच होती. दिल्लीच्या ताफ्यातून रेल्वे विरुद्धच्या रणजी मॅचमध्ये विराट मैदानात उतरल्यामुळे अरुण जेटली स्टेडियमवरील माहोल एकदम खास अन् हाऊसफुल शो असा सीन पाहायला मिळाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DDCA च्या शेफनं शेअर केली कोहलीच्या लंचसंदर्भातील स्पेशल स्टोरी
स्टार क्रिकेटरच्या एन्ट्री पासून ते अगदी त्याची एक झलक पाहण्यापासून चाहत्यांनी तुफान केलेल्या तुफान गर्दीची चर्चा रंगत असताना आता मॅच दरम्यानच्या लंच टाइममध्ये कोहलीनं काय खाल्लं हा मुद्दा चर्चेत आलाय. दिल्ली अँण्ड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे शेफ संजय झा यांनी कोहलीच्या लंच मागची स्पेशल स्टोरी शेअर केली आहे.
लंच वेळी कोहलीनं चिली पनीरला दिली पंसती
दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील रणजी सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान लंच ब्रेकमध्ये विराट कोहलीनं कँटिनमधील नियमित आणि सुरुवातीच्या काळात आवडीचा पदार्थ खाण्यालाच पसंती दिली. DDCA कँटिनमधील शेफ संजय झा यांनी मॅच दरम्यान कोहलीनं चिली पनीरला पसंती दिल्याचे सांगितले आहे.
विशेष म्हणजे त्याने स्वत: दिली ऑर्डर
संजय झा यांनी कोहलीच्या लंचसंदर्भातील खास गोष्ट शेअर करताना सांगितले आहे की, विराट कोहलीनं स्वत: ट्रेनिंग सेशन झाल्यावर लंचमध्ये चिली पनीरची ऑर्डर दिली. विराट कोहली स्टार झाला पण तो अजूनही माझं नाव नाही विसरला, ही आतली गोष्टही शेफनं शेअर केलीये. संजय जी अशी हाक मारत कोहलीनं त्यांना लंच ब्रेकमध्ये काय खाणार ते सांगितले होते. एवढा मोठा स्टार झाला असला तरी तो माझं नाव विसरला नाही, असे ते म्हणाले.
मी आपल्या कँटिनमध्ये जे मिळतं तेच खाईन
संजय झा हे जवळपास ५० वर्षांपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील कँटिनमध्ये कार्यरत आहेत. १२ वर्षांपूर्वी विराट कोहली ज्यावेळी या मैदानात खेळायला यायचा त्यावेळीही तो चिली पनीर डिशलाच पसंती द्यायचा. बाहेरून काही मागवायचं का? असं शेफनी कोहलीला विचारलं होते. पण मी आपल्या कँटिनमधील खाईन, असं म्हणत स्टार क्रिकेटरनं जुन्या गोष्टींना उजाळा दिल्याचा किस्साही संजय झा यांनी शेअर केला आहे.
Web Title: Sanjay Jha man who cooks chilli paneer and curry rice for Virat Kohli See Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.