नवी दिल्ली: भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या फेरनियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. पण, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी गावस्कर यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे.
संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे की, ''गावस्कर यांचा मी सन्मान करतो. परंतु त्यांनी केलेल्या मताशी मी सहमत नाही. भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत केलेली कामगिरी खराब नव्हती. भारताने या स्पर्धेत 7 सामने जिंकले तर फक्त दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. शेवटच्या सामन्यात तर निसटता पराभव झाला होता.''
सुनिल गावस्करांनी Mid-Day या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले होते की, ''वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समितीनं कर्णधारपदासाठी बैठक बोलवायला हवी होती. विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरलेला नाही. माझ्या माहितीनुसार त्याचे कर्णधारपद हे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होते. त्यानंतर कर्णधारपदासाठी निवड समितीनं बैठक बोलावणे अपेक्षित होते."