Join us  

संजय मांजरेकर Exclusive : आयपीएल हेच क्रिकेटचे भविष्य आहे

संजय मांजरेकर. 'मिस्टर परफेक्ट' क्रिकेटपटू, सुरेल समालोचक आणि कणखर टीकाकार. सध्या आयपीएल सुरु असताना मांजरेकर यांची खास मुलाखत 'लोकमत.com'ने घेतली. यावेळी विराट कोहलीचे नेतृत्व, धोनीचे मार्गदर्शन, आयपीएल, विश्वचषक आणि बऱ्याच गोष्टींवर मांजरेकर यांनी आपली मते व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 4:27 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला ट्वेन्टी-20 क्रिकेटला भरपूर प्रसिद्धी मिळते. त्याचबरोबर आयपीएलही चांगल्या फॉर्मात आहे. लोकांचे मन जिंकण्यात आयपीएल यशस्वी ठरले आहे. भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांचेही क्रिकेटबाबत असेच मत आहे. याबद्दल बोलताना, आयपीएल हे क्रिकेटचे भविष्य आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद आयपीएलला मिळत आहे. त्यामुळे भविष्यातही आयपीएल दोन देशांच्या मालिकेपेक्षाही जास्त पाहिले जाईल, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.

याबाबत ते म्हणाले की, " आयपीएल हे भविष्य आहे.  आयपीएल मोठं होणार आणि द्विदेशीय मालिका कमी होत जाणार. लोकांची पसंती आयपीएललाच जास्त आहे. त्यामुळे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळायला अधिक पसंती देतील. जर मालकांनी एवढे पैसे देऊन जर एखाद्या खेळाडूला संघात घेतले असेल, तर त्या खेळाडूला खेळावेच लागेल, हीदेखील गोष्ट महत्वाची ठरते. "

आयपीएल चेन्नई सुपर किंग्स जिंकेलचेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळायला मला आवडलं असतं. धोनीचे कर्णधारपद आणि फलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमध्ये जास्त प्रभावी दिसतं. मुंबई इंडियन्सलाही जिंकण्याची संधी आहे. पण त्यांनी संघात काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादचा संघ मला जास्त आवडतो. कारण त्यांच्याकडे स्पेशालिस्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत, असे मांजरेकर यांनी सांगितले.

आयपीएलमुळे फलंदाजी बिघडलीआयपीएलमुळे फलंदाजीचे तंत्र थोडेसे बिघडले आहे. जास्तकरून बचावात्मक फलंदाजी पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं. सर्व जगभरात हे झालं आहे. चेंडू स्विंग व्हायला लागला की फलंदाज अडचणीत आल्यासारखे वाटतात. सध्याच्या घडीला कसोटी सामने जास्त निकाली लागताना पाहयला मिळत आहेत. त्यामुळे चेतेश्वर पुजारासारखा खेळाडू सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कसोटी क्रिकेट ज्यांना आवडतं ते बचावावर जास्त लक्ष देतील. लोकांनी क्रिकेट पाहावं, असंही बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे आजची पिढी ही बचाव पाहायला स्टेडियममध्ये जाणार नाही. मला कसोटी आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट आवडतं, पण एकदिवसीय क्रिकेट आवडतं नाही, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्स