मुंबई, यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सहापैकी सहा सामने गमवावे लागले आहेत. बंगळुरुला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही, त्यामुळेच गुणतालिकेत ते तळाला आहेत. यानंतर आता कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या विषयावर भारताचे माजी परफेक्ट फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी विश्वचषकात कोहलीचे एक कर्णधार म्हणून खरे रुप दिसेल, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
विराटच्या अपयशाबद्दल मांजरेकर म्हणाले की, " विराट आयपीएलमध्ये अयशस्वी राहिला आहे. संघाकडून संघ निवड चांगली झालेली नाही. विश्वचषकाला जाणार तेव्हा एक वेगळाच जोश असेल. विश्वचषकात कोहलीला ड्रेसिंगरुममध्ये मोहम्मद सिराज नाही तर जसप्रीत बुमरा दिसणार आहे, असे बरेच फरक आपल्याला दिसतील. क्रिकेटमध्ये कोहलीचं एक वेगळं रुप असतं. त्यामुळे आयपीएलचा विश्वचषकावर काही परीणाम होणार नाही."
कॅप्टन असावा तर असा...खरा कॅप्टन तो जो स्वत: खेळाडूंसाठी एक आदर्श आपल्या कामगिरीतून उभा करतो. तुम्ही 3-4 वर्ष कर्णधार असाल तर त्यानंतर तुमच्या कप्तानीखाली खेळायला सुरुवात करणारे खेळाडू मोठे व्हायला हवेत.
विश्वचषकासाठी भारत सर्वात बलवान संघविश्वचषकासाठी भारत हा सर्वात चांगला संघ आहे. पण विश्वचषकात चांगला संघ जिंकेल, असे पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलियाचा चांगाल खेळ होतोय. पहिले काही सामने ते जिंकले तर त्यांना जेतेपदाची संधी असेल. न्यूझीलंडचा संघ चांगला आहे पण त्यांच्याकडे जिंकण्याची इर्षा नाही. इंग्लंडचा संघ दमदार असला तरी त्यांच्याकडे विश्वचषक जिंकण्याची जिद्द दिसत नाही.