कसोटीत पाचव्या स्थानी रहाणेच योग्य- संजय मांजरेकर

राहुलला स्थानिक क्रिकेटमध्ये धावा काढण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:27 AM2020-06-20T04:27:42+5:302020-06-20T06:55:09+5:30

whatsapp join usJoin us
Sanjay Manjrekar feels Ajinkya Rahane is still good at No 5 in Test cricket | कसोटीत पाचव्या स्थानी रहाणेच योग्य- संजय मांजरेकर

कसोटीत पाचव्या स्थानी रहाणेच योग्य- संजय मांजरेकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : अजिंक्य रहाणेकडे भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अजिंक्यला स्वत:चे स्थान गमवावे लागले मात्र कसोटी संघात मधल्या फळीमध्ये तो भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. अलीकडे त्याची कामगिरी फारशी चांगली नसली तरी पाचव्या स्थानासाठी तो योग्य फलंदाज असल्याचे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

‘शिखर धवनचा हरवत चाललेला फॉर्म, रोहित शर्माने कसोटीतही सलामीच्या जागेवर केलेली चांगली कामगिरी आणि लोकेश राहुलच्या कामगिरीत नसलेले सातत्य यामुळे कसोटीत संघात सलामीच्या जागेवर मयांक अग्रवालला नेमकी साथ कोण देणार, हा प्रश्न कायम आहे. २०१९ साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी लोकेश राहुलला कसोटीतील स्थान गमवावे लागले होते. यानंतर राहुलने दमदार पुनरागमन केले. पण कसोटी संघात त्याला स्थान मिळवता आले नाही.

‘पाचव्या स्थानावर लोकेश राहुलची कामगिरी चांगली आहे यात वाद नाही, पण अजिंक्य रहाणे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जसा खेळत होता तसा आता खेळताना दिसत नाही हे खरे असले तरी अजिंक्यला जुन्या फॉर्मात परतताना पहायला आवडेल. अजिंक्यचा एकंदर अनुभव पाहता माझ्या मते कसोटीत पाचव्या स्थासाठी तोच योग्य उमेदवार असल्याचे,’ मांजरेकर यांचे मत आहे.

‘राहुलबद्दल बोलायचे तर विंडीज दौºयात कसोटी मालिकेत तो फारसा यशस्वी ठरला नव्हता हेदेखील विसरता येणार नाही,’ असे मांजरेकरनी यू-ट्यूब चॅनेलवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताने वेगवेगळे कर्णधार निवडावे काय, असा प्रश्न विचारताच मांजरेकर म्हणाले, ‘तिन्ही प्रकारात चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा कर्णधार असेल तर वेगळा कर्णधार निवडण्याची गरज नाही. विराट कोहली हा तिन्ही प्रकारात चाणाक्ष नेतृत्व करीत असल्याने भारताला वेगळा कर्णधार निवडण्याची गरज नाही, मात्र भविष्यात ही गरज भासू शकते.’ (वृत्तसंस्था)

कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीतल्या जागेवर हक्क सांगायचा असेल तर राहुलला आधी स्थानिक क्रिकेटमध्ये भरपूर धावा कराव्या लागतील. मयांक अग्रवालनेही स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती, असे सांगून मांजरेकर म्हणाले, ‘नव्या वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौºयात कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुलला संधी नाकारण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.’

Web Title: Sanjay Manjrekar feels Ajinkya Rahane is still good at No 5 in Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.