नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आगामी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ निवडला आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. मांजरेकर यांनी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांची निवड केली आणि हार्दिक पांड्यावर चौथा गोलंदाज म्हणून विश्वास दाखवला. आयपीएल २०२३ मध्ये दुखापत झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर राहिलेल्या लोकेश राहुलला देखील मांजरेकरांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं. याशिवाय श्रेयस अय्यर किंवा तिलक वर्मा या दोघातील एकाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा असंही त्यांनी सूचवलं.
ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना ते म्हणाले की, माझे तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी असतील. हार्दिक पांड्या हा माझा चौथा वेगवान गोलंदाज असेल. माझे फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव असतील. माझे सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा असतील. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विराट कोहली असेल. लोकेश राहुल संघात असेल कारण तो यष्टीरक्षक आहे. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर किंवा तिलक वर्मा यापैकी एकाला मी संधी देईन.
माजरेकरांनी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी निवडला भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर १७ सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेनंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होईल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात २ सप्टेंबर तर विश्वचषकात १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Sanjay Manjrekar names his India's XI for Asia Cup 2023 encounter against Pakistan, he has given Tilak Verma a chance in his team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.