विंडीजच्या पराभवामुळे लंकेला संजीवनी, विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले

वेस्ट इंडीजचा इंग्लंडने वन डेत पराभव केल्यामुळे श्रीलंकेला संजीवनी लाभली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात थेट प्रवेश करणारा श्रीलंका आठवा आणि अखेरचा संघ बनला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत लंकेचे ८६ गुण राहणार असल्याने विंडीजऐवजी हा संघ पात्र ठरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:45 AM2017-09-21T03:45:40+5:302017-09-21T03:45:48+5:30

whatsapp join usJoin us
Sanjivani, the dream of West Indies to break into the World Cup, breaks the West Indies defeat | विंडीजच्या पराभवामुळे लंकेला संजीवनी, विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले

विंडीजच्या पराभवामुळे लंकेला संजीवनी, विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


दुबई : वेस्ट इंडीजचा इंग्लंडने वन डेत पराभव केल्यामुळे श्रीलंकेला संजीवनी लाभली. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात थेट प्रवेश करणारा श्रीलंका आठवा आणि अखेरचा संघ बनला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत लंकेचे ८६ गुण राहणार असल्याने विंडीजऐवजी हा संघ पात्र ठरला.
आयसीसीच्या पत्रकानुसार, कॅरेबियन संघाचे वन डेत ७८ रँकिंग गुण आहेत. या संघाला आता पात्रता सामन्यात विजेता किंवा उपविजेता बनल्यानंतरच मुख्य फेरीत खेळता येईल. १९९६चा विजेता श्रीलंका संघ यजमान इंग्लंड, भारत, आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्या पंक्तीत सहभागी झाला. श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगा म्हणाला, ‘‘आम्ही वन डेत बदलाच्या स्थितीत असल्याने संकटात आहोत, हे लपून राहिलेले नाही; तरीही आमच्यावर विश्वास दाखविणाºया चाहत्यांचा मी मनापासून आभारी आहे.’’
विश्वचषकाचे पात्रता सामने पुढील वर्षी ३० मे ते १५ जुलै या कालावधीत होतील. यातील विजेता आणि उपविजेता संघ मुख्य स्पर्धेत आघाडीच्या ८ संघांसोबत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)
>बेयरस्टोच्या शतकामुळे इंग्लंड विजयी
सलामीवीर जॉनी बेयरस्टोच्या पहिल्या वन डे आंतरराष्टÑीय शतकी खेळीच्या बळावर मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर इंग्लंडने वेस्ट इंडीजवर ७ गड्यांनी विजय साजरा केला. या पराभवामुळे २०१९च्या विश्वचषकात थेट प्रवेशाचे विंडीजचे स्वप्न भंगले.
१९७५ आणि १९७९चा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडीजला आता विश्वचषकात स्थान मिळविण्यासाठी पात्रता सामने खेळावे लागतील. ५ सामन्यांच्या सध्याच्या मालिकेत त्यांना ५-० अथवा ४-० असा विजय मिळविणे क्रमप्राप्त झाले होते. बेयरस्टोच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडने २०५ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

Web Title: Sanjivani, the dream of West Indies to break into the World Cup, breaks the West Indies defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.