हर्षा भोगले लिहितात...कोलकाता नाईट रायडर्सला सर्वप्रथम ज्या बाबींवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यातील एक म्हणजे ते ज्यावेळी मैदानात उतरतील त्या वेळी आंद्रे रसेल पूर्णपणे मॅच फिट असायला हवा. टी-२० सामन्याचे चित्र नाट्यमय पद्धतीने बदलणारे मोजके खेळाडू आहेत आणि जमैकाचा रसेल त्यापैकी एक आहे. तो ज्यावेळी तीन-चार षटकांमध्ये सामन्याचे चित्र पालटतो त्या वेळी तुम्हाला कल्पना येईल की, आयपीएलमध्ये सर्वांत मौल्यवान खेळाडूंमध्ये त्याची गणना का केली जाते.केकेआरने त्याला आपल्या तंबूत सामील करीत आणि विशेषत: खेळापासून तो दूर गेला असतानाही त्याच्यासोबत संपर्क साधत चांगले काम केले. प्रामाणिकपणा रक्तात असतो. तुम्ही किती पैसे खर्च करता यावर ते अवलंबून नसते. अनेकदा गरज नसताना तुम्ही कसे वर्तन करता त्याचा खोल ठसा उमटत असतो. केकेआरने असाच व्यवहार रसेल व सुनील नारायणसोबत केला आहे, तेही त्यांच्या अडचणीच्या वेळी. त्यामुळेच या दोघांना केकेआरमध्ये त्यांना आपला मित्र दिसत आहे. रसेलची आक्रमकता व फलंदाजीतील रंगत आपण अनुभवली आहे, पण विद्यमान आयपीएल मोसमात शानदार गोलंदाजी करणारा सुनील नारायण त्याच्यापेक्षा वेगळा आहे. सुनीलने आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेरच्या चेंडूवरही बळी घेतला, तरी तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर काही भाव दिसतील, असे मला वाटत नाही. तो एका वेगळ्या पातळीवर पोहोचला आहे.नितीश राणा संघात चांगला समरस झाला आहे आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध रॉबिन उथप्पाची छोटी व महत्त्वाची खेळी उत्साह वाढविणारी आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संजू सॅमसनने तेच केले. तसे उथप्पाला ३० धावांच्या खेळीचे रूपांतर ७०-८० धावांच्या खेळीत करण्याची गरज आहे. जर उथप्पा दोन-तीन वेळेस असे करण्यात यशस्वी ठरला आणि राणा काही सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला तर हा संघ मजबूत भासायला लागेल. संजू सॅमसनचा खेळ बघून मला आनंद झाला. या युवा खेळाडूमध्ये काहीतरी विशेष आहे. त्याने कामगिरीत सातत्य राखायला हवे. तो एक यष्टिरक्षकही आहे, याची लोकांना आठवण करून द्यायला हवी. केरळसाठी यंदाच्या मोसमात त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण आयपीएल असे व्यासपीठ आहे की जेथे तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाते. राजस्थान रॉयल्स ज्यावेळी कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध खेळेल त्यावेळी माझी नजर संजू सॅमसनच्या कामगिरीवर राहील. (टीसीएम)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- संजू सॅमसनमध्ये काही विशेष आहे
संजू सॅमसनमध्ये काही विशेष आहे
कोलकाता नाईट रायडर्सला सर्वप्रथम ज्या बाबींवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यातील एक म्हणजे ते ज्यावेळी मैदानात उतरतील त्या वेळी आंद्रे रसेल पूर्णपणे मॅच फिट असायला हवा. टी-२० सामन्याचे चित्र नाट्यमय पद्धतीने बदलणारे मोजके खेळाडू आहेत आणि जमैकाचा रसेल त्यापैकी एक आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 2:47 AM