India vs South Africa, Sanju Samson : भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाची घोषणा झाली अन् सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला. रिषभ पंतच्या निवडीवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्याजागी संजू सॅमसनला संधी मिळायला हवी होती असं मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केले. भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. मागून आलेले रिषभ पंत, इशान किशन यांनीही सॅमसनपेक्षा अधिक ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. इशान २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. त्यामुळेच आता संजू सॅमसनच्या चाहत्यांनी निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २८ सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यात BCCI ची डोकेदुखी वाढणार आहे.
BCCI ने ट्वेंटी-२० संघातून वगळलं, Sanju Samsonच्या एका पोस्टनं सोशल मीडिया ढवळून निघालं
BCCI ने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसोबतच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी आज संघ जाहीर केले. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारे खेळाडू या दोन्ही मालिकेत कायम ठेवले गेले आहेत. मोहम्मद शमी, दीपक चहर यांचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. यातही संजू सॅमसनला वगळले गेले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचा अधिकाधिक सराव व्हावा यासाठी हा त्याच खेळाडूंना निवडले गेले आहे.
भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरीच क्लासेन, रिझा हेड्रीक्स, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्ट्जे, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसोव, तब्रेझ शम्सी, त्रिस्तान स्टुब्स; राखीव - बीजॉर्न फोर्टून, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो.द. आफ्रिकेविरुद्धचे वेळापत्रक - २८ सप्टेंबर- तिरुअनंतपूरम, २ ऑक्टोबर - गुवाहाटी व ४ ऑक्टोबर- इंदूर
२८ तारखेच्या सामन्यात निषेधसंजू सॅमसनला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात न निवडल्याचा निषेध त्याच्या चाहत्यांकडून नोंदवण्यात येणार आहे. तिरुअनंतपूरम येथे होणाऱ्या या सामन्यात फॅन्स संजूच्या नावाचं टी शर्ट घालून स्टेडियमवर मोठ्या संख्येने येणार आहेत आणि BCCI चा निषेध करणार आहेत.