Join us  

Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: "तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता"; संजू सॅमसनने नो बॉल वादावर केलं भाष्य

चेंडू फुल टॉस कमरेच्या वर असल्यावर नो-बॉल दिला जातो, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 9:19 PM

Open in App

Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: यंदाच्या हंगामात सुमार अंपायरिंगचा फटका अनेक खेळाडू आणि संघांना बसला आहे. नेटकऱ्यांनीही वेळोवेळी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तशातच शुक्रवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) १५ धावांनी पराभव केला. या मोसमात राजस्थान संघाने हा पाचवा विजय नोंदवला. या विजयासोबत गुणतालिकेत राजस्थानने अव्वल स्थान पटकावले. हा सामना रोमहर्षक होताच, पण या सामन्यात नो बॉलवरून वाद झाला. घडलेल्या प्रकारानंतर संजू सॅमसनने आपले मत व्यक्त करत असताना तो चेंडू नो बॉल नसल्याचे सांगितले.

दिल्ली संघाला शेवटच्या षटकांत ३६ धावांची गरज होती. ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर रॉवमन पॉवेलने षटकार खेचला, पण तिसऱ्या चेंडूला 'नो-बॉल' न दिल्याने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि त्याने आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावण्यास सुरुवात केली. सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे हावभावाने 'नो-बॉल' तपासण्यास सांगत होते, त्यामुळे सामना काही काळ थांबला होता. याबाबत संजू सॅमसनने आपले मत व्यक्त केले.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नो-बॉल वादावर भाष्य केले. "चेंडू फुलटॉस होता हे मला मान्य आहे. पण अंपायरने तो चेंडू वैध ठरवला होता. तो चेंडू नो बॉल नव्हता. अंपायरदेखील त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तो एक षटकार होता, तो पूर्ण फुलटॉस  होता. अंपायरने त्याला सामान्य चेंडू म्हटले, पण फलंदाज तो 'नो-बॉल' असावा अशी मागणी करत होते. पण पंचांनी आपला निर्णय स्पष्ट केला आणि ते त्यावर ठाम राहिले.

टॅग्स :आयपीएल २०२२संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सरिषभ पंत
Open in App