Sanju Samson Rishabh Pant IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च येथे तिसरा वन डे सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून किवींनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसरी लढत पावसामुळे रद्द करावी लागली आणि ICC क्रमवारीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी घसरली. आज भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचे आणि बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर सोशल मीडियावर रिषभ पंतवर मोठ्या प्रमाणावर टीका पाहायला मिळाली.
संजूला टी२० मालिकेत संधी न दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या वन डे मध्ये त्याला खेळवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव त्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर संजूने श्रेयस अय्यरसोबत टीम इंडियाचा डाव सावरला आणि तीनशेपार मजल मारून दिली. पण, भारताला सामना गमवावा लागला. अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी संजूला दुसऱ्या वन डे तून बाहेर बसवण्यात आले आणि दीपक हुडाला संधी दिली. तिसऱ्या वन डेतही भारताने तोच संघ कायम ठेवला. त्यानंतर रिषभ पंतवर टीकेचा भडीमार झाला.
-----
-----
-----
-----
दरम्यान, हा सामना जिंकणे भारतासाठी क्रमप्राप्त आहे. या सामन्यात भारत जिंकला तरच मालिका बरोबरी सोडवता येऊ शकते.
Web Title: Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: Sanju Samson denied chance netizens Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.