'त्या' ३ जादुई शब्दांमुळे ठोकलं दमदार शतक; संजू सॅमसनने सांगितलं खास खेळीमागचं 'सीक्रेट'

आफ्रिकेविरूद्ध महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनने केली १०८ धावांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 04:59 PM2023-12-22T16:59:24+5:302023-12-22T17:04:54+5:30

whatsapp join usJoin us
Sanju Samson shares secret of 3 magical words which enhanced him to play century knock IND vs SA 3rd ODI | 'त्या' ३ जादुई शब्दांमुळे ठोकलं दमदार शतक; संजू सॅमसनने सांगितलं खास खेळीमागचं 'सीक्रेट'

'त्या' ३ जादुई शब्दांमुळे ठोकलं दमदार शतक; संजू सॅमसनने सांगितलं खास खेळीमागचं 'सीक्रेट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sanju Samson Secret, IND vs SA: भारतासाठी करो वा मरोचा वन डे सामना असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने २९६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या संघाला शरणागती पत्करावी लागली. अनेकदा सोशल मीडियावर आपल्याला संजू सॅमसनशी संबंधित काही ट्रेंड दिसायचे, जिथे त्याला संघात घेण्याबाबत सांगितले जायचे. पण त्याच्या खेळांतील चुकांमुळे तो संघाबाहेर असल्याचे अनेक वेळा बोलले जायचे. तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याच्या मॅचविनिंग खेळीनंतर त्याने त्याच्या या खेळीमागच्या तीन जादुई शब्दांची कहाणी सांगितली.

संजू सॅमसनने सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु या प्रदीर्घ कार्यकाळात तो जास्त सामने खेळू शकला नाही. पण आता त्याच्या बॅटमधून मोठी खेळी आली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संजू सॅमसनने या मालिकेचा खूप आधीपासून सराव केला होता. जेव्हा तो केरळमध्ये तयारी करत होता, तेव्हा नेट्समध्ये सरावाच्या वेळी फलंदाजीपूर्वी तीन शब्द बडबडत असायचा- 'मॅचविनिंग इनिंग खेळ, मॅचविनिंग इनिंग खेळ' (‘Play matchwinning innings, play matchwinning innings’) त्याच्या याच तीन शब्दांनी जादू घडवली.

जेव्हा संजू सॅमसनचे विश्वचषक संघातील स्थान हुकले तेव्हा अनेकांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. पण त्याने मात्र त्याकडे लक्ष न देता पुन्हा सराव करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्थानिक क्रिकेटमधील चांगली कामगिरी पाहून त्याला टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळाले. अखेर आफ्रिकेविरूद्धच्या करो वा मरोच्या लढतीत संजू सॅमसनने १०८ धावांची खेळी केली.

केरळ सामन्यात संजूचे वैयक्तिक प्रशिक्षक बिजुमन एन हे त्याच्यासोबत उपस्थित होते आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्यांनी संजूवर बारीक नजर ठेवली होती. येथे एनसीएमध्ये आफ्रिकेनुसार खेळपट्टी खास तयार करण्यात आली होती, जेणेकरून तेथे फलंदाजी करता येईल आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत 24 टी-20 आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2015 मध्ये त्याचे टी-20 पदार्पण झाले आणि 2021 मध्ये एकदिवसीय पदार्पण झाले. संजूने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली परंतु तो टीम इंडियामध्ये नियमित राहू शकला नाही आणि याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

Web Title: Sanju Samson shares secret of 3 magical words which enhanced him to play century knock IND vs SA 3rd ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.