दुबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीमुळे प्रभावित झाले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या या युवा यष्टिरक्षक फलंदाजाने मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ३२ चेडूंना सामोेरे जाताना ९ षटकारांच्या साहाय्याने ७४ धावांची अतुलनीय खेळी केली. त्यामुळे संघाला विजयी सुरुवात करता आली.
यावर सुनील गावस्कर यांनी प्रतिकिया व्यक्त केली की, जर संजू अशाच प्रकारची खेळी करीत राहिला तर त्याला भारतीय संघाचा स्थायी सदस्य होण्यापासून कुणी रोखू शकत नाही.
गावस्कर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत संजू सॅमसनची प्रशंसा करताना म्हटले की, ‘अतुलनीय, नक्की हा युवा खेळाडू प्रतिभावान आहे. त्याच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे.’ सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना संजूने आपल्या यशाचे रहस्य उघड केले. कोरोना व्हायरस महामारीदरम्यान लॉकडाऊनमध्ये मी कसून मेहनत घेतली. त्याचे मला फळ मिळाले.
भारतीय संघातील सॅमसनच्या दावेदारीबाबत बोलताना गावस्कर म्हणाले, ‘अशा प्रकारची कामगिरी केली तर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यापासून कुणी रोेखू शकेल, असे मला वाटत नाही. फलंदाज म्हणून तो संघातील स्थान निश्चित करू शकतो.
एनगिडीच्या दोन चेंडूवर २७ धावा!
मंगळवारी रात्री रॉयल्सविरुद्ध २० व्या षटकात गोलंदाजी करताना सीएसकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवल्या गेला. एनगिडीच्या पहिल्या चेंडूवर आर्चरने षटकार ठोकला. त्याचा दुसरा चेंडूही आर्चरने सीमारेषेबाहेर भिरकावला. एनगिडीचा तिसरा चेंडू नोबॉल होता. त्यावरही आर्चरने षटकार ठोकला आणि चौथा चेंडूही नोबॉल होता त्यावरही आर्चरने षटकार ठोकला. त्यानंतर एनगिडीने वाईड चेंडू टाकला. याप्रकारे त्याच्या दोन चेंडूंमध्ये राजस्थान रॉयल्सने २७ धावा वसूल केल्या.
Web Title: Sanju Samson's hard work paid off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.