Join us  

अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू शतकानंतर बहिण सारा इमोशनल; मनातल्या भावना शेअर करत केली तारीफ

अर्जुनच्या या पदार्पणाचे सध्या जबरदस्त कौतुक होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 9:39 AM

Open in App

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाने अर्थात अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करत 34 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अष्टपैलू क्रिकेटर म्हणून पदार्पण करणाऱ्या अर्जुनने जबरदस्त शतक झळकावले आहे. त्याने 120 धावांची सुरेख खेळी केली. यानंतर त्याची बहीण सारा तेंडुलरने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मनातील भानवा व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सचिन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्यात नाबाद शतक ठोकले होते.

अर्जुनच्या या पदार्पणाचे सध्या जबरदस्त कौतुक होत आहे. सिस्टर सारानेही इंस्टाग्रामवर अर्जुनच्या पदार्पणाचे कौतुक करत, तुझ्या संपूर्ण मेहनतीचे आणि संयमाचे हळूहळू फळ मिळू लागले आहे. ही तर सुरुवात आहे. मला तुझी बहीण असण्याचा अभिमान आहे, असे साराने लिहिले आहे. यापूर्वी, अर्जुन तेंडुलकर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळत होता. मात्र, आता तो गोव्याकडून खेळत आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत स्वत:ला सिद्ध केले आहे.

अर्जुनने राजस्थान संघाविरुद्ध खेळताना ही खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो केवळ चार धावांवर नाबाद होता. अर्जुन तेंडुलकरने आपल्या खेळीत दोन षटकार आणि 16 चौकार लगावले. या पदार्पणानंतर त्याला लवकरच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत तो मुंबई इंडियन्स संघात होता. मात्र, तो डेब्यू करू शकला नाही.

यासामन्यात अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अर्जुन तेंदुलकर सध्या 23 वर्षांचा आहे. आयपीएल 2022च्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियंसने त्याला 30 लाख रुपयांत घेतले होते.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकररणजी करंडकगोवा
Open in App