Sara Tendulkar Arjun Tendulkar, IPL 2022: मुंबई इंडियन्स संघाचा IPL 2022 मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. ८ गुणांसह यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ तळाशी राहिला. यंदा मुंबईच्या संघाने भरपूर नव्या खेळाडूंना संधी दिली. प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई आधीच बाहेर गेली असल्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संघात खेळण्याची संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. गेल्या वर्षीपासून अर्जुन मुंबई संघाचा भाग असल्याने कदाचित त्याला संधी मिळेल असा अंदाज होता. पण तसं घडलं नाही. अर्जुनला एकाही सामन्यात संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर त्याची बहिण सारा तेंडुलकर याने मात्र एक भावनिक पोस्ट करून त्याला पाठिंबा दर्शवला.
अनेक क्रिकेट जाणकारांनी अर्जुन यंदाच्या हंगामात संघात खेळेल असा अंदाज व्यक्त केला होता. मेगालिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने ३० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, IPL 2021 मध्येही मुंबई इंडियन्सने अर्जुनला विकत घेतले होते, पण त्यावेळीही त्याला एकाही सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. यंदा त्याचे IPL पदार्पण होण्याची शक्यता सर्वाधिक होत. तरीही तसं घडलं नाही. पण साराने मात्र यंदा सामन्यासाठी उपस्थित असताना अर्जुनचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो मैदानाबाहेर बॉलबॉय म्हणून काम करत होता. त्या व्हिडीओमागे 'अपना टाईम आएगा', असं गाणं लावून तिने भावाला भावनिक पाठिंबा दिला.
साराची आपल्या भावासाठी केलेली पोस्ट नेटकऱ्यांना चांगलीच भावली. अनेकांनी साराच्या त्या पोस्टचे कौतुक केले. बऱ्याच चाहत्यांनी अर्जुनला मुंबई संघातून संधी द्यायला हवी होती असा सूर लावला. तर काहींनी अर्जुनला संधी न दिल्याबद्दल रोहित शर्मावरही टीका केली.
Web Title: Sara Tendulkar emotional post for Arjun Tendulkar who did not get single game from Mumbai Indians Instagram Story
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.