भारताचा दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. सारा तिच्या व्हेकेशन, शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. साराने नुकतंच जाहिरातीचं शूटही केलं होतं. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. सोबतच तिचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबतही जोडलं जातं. त्यांचीही चर्चा सुरू असते. अशात आता सारा गोव्यात आहे. तिने तेथील एक फोटो शेअर केला जो व्हायरल झालाय.
सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअऱ केलाय. ज्यात ती निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिच्या हातात काही गुलाबाची फुलं आहेत. तर फोटो कुणाचेतरी हातही दिसत आहेत. याचाच प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे. लोक विचारत आहेत की, हे हात कुणाचे आहेत? तिच्या या फोटोवर गायिका कनिका कपूरने कमेंटही केली आहे.
साराचे हे गोव्यातील फोटो यूजर्सना आवडले आहेत. लोक या फोटोवर मजेदार कमेंट्सही करत आहेत. लोकांनी इथेही शुभमन गिलचा उल्लेख सुरू केला. एका यूजरने लिहिलं की, भावा, शुभमन गिल तू कुठे आहेस?.
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. इतकंच नाही तर एकमेकांच्या परिवारांना देखील फॉलो करतात. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत नेहमीच चर्चा होत असते.तेच साराने मॉडलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. नुकतंच तिने एका ब्रॅन्डसाठी शूटही केलं. याचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते.