Join us

Sara Tendulkar : पाऊस, वारा अन् तेंडुलकरांची सारा! पहिल्या दिवशी मॅचपेक्षा याचीच रंगली अधिक चर्चा

पहिल्या दिवसाचा खेळ जास्त काळ नाही रंगला, पण साराची एक झलक दिसली त्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:49 IST

Open in App

Sara Tendulkar Spotted Cheering For India Gabba, Brisbane Test Match : सारा तेंडुलकर ही लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकीनं सोशल मीडियावर आपला एक वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट असणारा हा चेहरा पुन्हा एकदा मॅचमुळे चर्चेत आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथील गाबा मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेण्यासाठी ती चक्क स्टेडियमवर पोहचल्याचे स्पॉट झाले. आता ती स्टेडियमवर दिसली याची चर्चा होणार नाही, असे कसे होईल. पहिल्या दिवसाचा खेळ जास्त काळ नाही रंगला, पण साराची एक झलक दिसली त्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

सारा दिसली अन्...

ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सारा तेंडुलकर स्टेडियमवर स्टँडमध्ये उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले. ब्लू आउटफिट्समध्ये दिसलेली तिची खास झलक दिसली अन्  सोशल मीडियावर तिच्यासंदर्भात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यापेक्षा ब्रिस्बेनमध्ये पाऊस, वारा अन् तेंडुलकरांची सारा हाच विषय चर्चेचा ठरला. स्टेडियममधील स्टँडमध्ये बसून आनंद घेतानाचे सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साराचा जो फोटो चर्चेत आहे त्यात ती ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहण्यापेक्षा  मोबाईलमध्ये व्यग्र असल्याचे दिसून येते. हा सीन तिला ऑस्ट्रेलियापेक्षा  टीम इंडियाची बॅटिंग पाहण्यात रस असल्याचे एक चित्र निर्माण करणारी आहे. 

तिनं इन्स्टाच्या माध्यमातूनही शेअर केलीये स्टोरी

गूड मॉर्निंग ब्रिस्बेन या कॅप्शनसह सारानं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातूनही भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यातील उत्सुकता दाखवून दिली आहे. आयपीएलमध्येही अनेकदा ती मुंबई इंडियन्स आणि भाऊ अर्जुन तेंडुलकर याला सपोर्ट देण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी ती टीम इंडियासाठी चीअर करताना दिसत आहे. 

टीम इंडियाशिवाय शुबमन गिलला खास सपोर्ट?

सारा तेंडुलकर स्टेडिममध्ये दिसली की, शुबमन गिलचं नावही चर्चेत येते. सारा तेंडुलकरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फोटोमुळे पुन्हा एकादा तोच सीन क्रिएट झाला आहे. सारा तेंडुलकरही खास शुबमन गिलला सपोर्ट करण्यासाठी आली असून तो ब्रिस्बेन कसोटीत शतकी खेळी करेल, अशा काही कमेंट्स सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. वेगवेगळ्या फोटोचा दाखला देऊन  शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यात प्रेमाचा खेळ सुरु असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पण या दोघांनी कधीच अधिकृतरित्या यावर भाष्य केलेले नाही. 

टॅग्स :सारा तेंडुलकरशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाऑफ द फिल्ड