Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: सारा तेंडुलकर सोबत 'लंच डेट'वर जाणारी ती खास व्यक्ती कोण? सोशल मीडियावर चर्चांना जोर

साराबरोबर तिच्याच कारमध्ये बसून 'तो' मुलगा निघून गेला. काही नेटिझन्सने तो मुलगा कोण असेल याचा अंदाज लावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:42 PM2022-02-01T16:42:54+5:302022-02-01T16:52:55+5:30

whatsapp join usJoin us
Sara Tendulkar spotted on Lunch Date with someone special some netizens guess mystery boy is Siddharth Kerkar from Goa Vacation see photos | Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: सारा तेंडुलकर सोबत 'लंच डेट'वर जाणारी ती खास व्यक्ती कोण? सोशल मीडियावर चर्चांना जोर

Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: सारा तेंडुलकर सोबत 'लंच डेट'वर जाणारी ती खास व्यक्ती कोण? सोशल मीडियावर चर्चांना जोर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायम चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर बरीच अँक्टीव्ह असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ रोजच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपासून साराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात सारा एका व्यक्तीसोबत होती. तो मुलगा साराच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता आणि सारानेही तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं होतं. तो मुलगा कोण, हे नंतर उघड झालं होतं. पण आता साराचा लंच डेटनंतर एका मुलासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सारा तेंडुलकरचा मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांच्या नजरा खिळणं हे स्वाभाविकच होतं, पण त्या व्हिडीओमध्ये सारासोबत असलेली 'ती' व्यक्ती सारापेक्षा जास्त भाव खाऊन गेली. सारा हक्कासन रेस्टॉरंटमधून बाहेर येऊन आपल्या कारमध्ये बसत होती, त्यावेळी काही पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी तिला गाठलं. साराबरोबर त्यावेळी तो तरूण मुलगाही होताच. साराने फोटोसाठी पोज दिली आणि नंतर लगेचच ती तेथून निघून गेली. इन्स्टंटबॉलिवूडने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे सारासोबत असलेला मुलगादेखील तिच्याबरोबरच कारमध्ये मागच्या सीटवर एकत्र बसून निघून गेला. दोघांनीही मास्क घातल्यामुळे तो तरूण कोण असावा ते ओळखता आलं नाही. आता तो तरूण नक्की कोण असेल? याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे.

सारासोबत असलेली व्यक्ती नक्की कोण?

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. त्यातही काहींनी हा तरूण गोव्याचा युवा चित्रकार सिद्धार्थ केरकर (Siddharth Kerkar) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेले काही दिवस सारा गोव्यात होती. तेथे साराच्या मित्रांमध्ये सिद्धार्थही होता. त्या दोघांमधील मैत्री आणि फोटो पाहून ते दोघे डेटिंग करत असल्याचा संशय नेटकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र मुंबईत लंच डेटवर तिच्या सोबत सिद्धार्थच होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सारा आणि सिद्धार्थचे काही व्हायरल झालेले फोटो-

सारा गोव्यात असताना तिच्या मित्रमंडळीमध्ये सिद्धार्थही सोबत होता. त्यावेळी एक व्हिडीओ सिद्धार्थने इन्स्टा स्टोरीवर शेअरही केला होता. तो व्हिडीओ-

दरम्यान, याआधी जेव्हा साराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात ती एक बिझनेससोबत उभी होती. वनराज जवेरी (Vanraj Zaveri) असं त्या व्यक्तीचं नाव होतं. तो Zavorr ज्वेलरी कंपनीचा सीईओ आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, सारा आणि वनराज हे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण यावेळी मात्र सारासोबत लंच डेटवर असलेला तरूण कोण? याबाबत चर्चा रंगली आहे.

Web Title: Sara Tendulkar spotted on Lunch Date with someone special some netizens guess mystery boy is Siddharth Kerkar from Goa Vacation see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.