सारा तेंडुलकरच्या फोनवर रंगल्यात गप्पा, त्याही हॉटेलबाहेरच्या पायरीवर; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

सारा तेंडुलकर सध्या गोव्यात असून तेथील काही खास फोटोही तिने गेल्या काही दिवसात शेअर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:36 PM2021-12-23T17:36:56+5:302021-12-23T17:37:52+5:30

whatsapp join usJoin us
Sara Tendulkar Video Goes Viral as She is busy on Phone sitting outside Goa Hotel | सारा तेंडुलकरच्या फोनवर रंगल्यात गप्पा, त्याही हॉटेलबाहेरच्या पायरीवर; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

सारा तेंडुलकरच्या फोनवर रंगल्यात गप्पा, त्याही हॉटेलबाहेरच्या पायरीवर; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर कायमच चर्चेत असतो. क्रिकेट खेळत असताना तो त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत असायचा तर निवृत्तीनंतर तो त्याच्या विविध सोशल मिडीया पोस्ट मुळे चर्चेत असतो. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून खेळणार होता. त्यामुळे IPL 2021 दरम्यान त्याच्या नावाची चांगलीच चर्चा होती. पण या सर्व गोष्टींपेक्षा वेगळी बाब म्हणजे सचिनची लेक सारा तेंडुलकर. सारा तिच्या नवनव्या फॅशनमुळे किंवा तथाकथित प्रेमसंबंधांच्या गॉसिपमुळे चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. तिच्या फोटोंनाही मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळतात. याच दरम्यान सध्या साराचा एक छोटासा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

सारा तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोव्यातील काही फोटो पोस्ट करताना दिसतेय. गोव्यात ती नक्की कोणत्या कारणासाठी गेलीय याबद्दल तिने आधी फॅन्सना सांगितलं नव्हतं. पण सध्या तिचा एक व्हिडीओ बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हॉटेल किंवा विलाच्या आसपासचा परिसर दिसतोय. त्यातच ज्यावेळी कॅमेरा फिरून साराकडे येतो त्यावेळी ती एका पायरीवर बसून कोणाशी तरी फोनवर गप्पा मारताना दिसते आहे. तसंच, कॅमेरा तिच्याकडे गेल्याचं कळताच ती कॅमेराकडे पाहून हात हलवून अभिवादनही करताना दिसते आहे. साराने स्वत: हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर गुरूवारी पोस्ट केला.

दरम्यान, सध्या सारा गोव्यामध्ये आहे. तेथील एक फोटो तिने आधीही शेअर केला होता. त्यात तिने निळ्या ड्रेस परिधान केला होता आणि हातात गुलाबाची फुलं होती. याचा फोटोचा नेमका अर्थ काय असा प्रश्नच साऱ्यांना पडला होता. पण आज साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवलेल्या तिसऱ्या व्हिडीओमधून सारा गोव्यात का गेली आहे याचं उत्तर मिळालं. साराची एक मैत्रिण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, त्यासाठी सारा गोव्यात गेल्याचं तिच्या स्टोरीवर स्पष्ट झालं आहे.

Web Title: Sara Tendulkar Video Goes Viral as She is busy on Phone sitting outside Goa Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.