पाकिस्तान आणि मॅच फिक्सिंग हे नातं काही नवं नाही. पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंग प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पण, आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान गोलंदाज वसीम अक्रम याच्यावरच मॅच फिक्सिंगचा आरोप झाला आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाजनं दावा केला की, 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे दोन सामने फिक्स केले गेले होते. या सामन्यातील फायनल आणि बांगलादेशविरुद्धचा सामना फिक्स केला होता, असा दावा करताना सर्फराजनं तत्कालीन कर्णधार अक्रमवर निशाणा साधला आहे.
सर्फराज नवाजनं पाकिस्तानच्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा गंभीर आरोप केला. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ मुद्दाम बांगलादेशकडून हरली होती. त्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा सर्फराजने केला. तो म्हणाला,''सामन्यापूर्वी मी स्टेडियममध्ये जाऊन कर्णधार वसीम अक्रमशी चर्चा केली. वसीमनं सांगितले की कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायला हवा कारण हा सामना फिक्स असल्याची अफवा पसरली आहे. वसीम म्हणालेला हा सामना आपण जिंकू, परंतु प्रत्यक्षात पाकिस्तान सामना हरला.''
1999 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने 62 धावांनी बांगलादेशकडून पराभव पत्करला होता. या सामन्याप बांगलादेशनं 50 षटकांत 223 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 161 धावाच करू शकला. तेच अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 132 धावा करू शकला आणि ऑस्ट्रेलियानं 20.1 षटकांत बाजी मारली होती.
सर्फराजनं दावा केला की,''सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या एक समिती नेमली होती आणि त्यांच्यासमोर अनेक खेळाडूंना हजर केले गेले होते. त्या समितीत सध्याचे पंतप्रधान इम्रान खान हेही होती. या समितीसमोर अक्रमने आपली संपत्ती पगारापेक्षा जास्त असल्याचे कबुल केले होते. तरीही इम्रान खान यांनी अक्रमचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात समावेश केला. याच लोकांचा पाकिस्तान सुपर लीगमध्येही सहभाग आहे आणि त्यामुळे तेथेही फिक्सिंग होत आहे.
हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना
भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...
Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...
Virat Kohli पुन्हा मदतीसाठी उभा राहिला, घेतला मोठा निर्णय