राजकोट : रणजी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्यानंतर उशिराने का होईना, पण अखेर सरफराज खानला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारताची गडद निळी टोपी मिळताच सरफराज आणि त्याचे कुटुंबीय भावुक झाले होते. त्यानंतर सामना सुरू असताना सरफराजचे वडील नौशाद खान यांना समालोचन कक्षात बोलविण्यात आले.
यावेळी त्यांना आकाश चोप्राने सरफराजला उशिराने मिळालेल्या संधीविषयी विचारले. यावर उत्तर देताना नौशाद खान यांनी आपला शायराना अंदाज जगाला दाखवून दिला. ते म्हणाले, ‘रात को वक्त चाहिये गुजरने के लिये, लेकिन सुरज मेरी मर्जी से नहीं निकलने वाला.’ यानंतर समालोचन कक्षातील सगळेच जण त्यांचे कौतुक करायला लागले. सोशल मीडियावरही नौशाद खान यांच्या शायरीची चर्चा होती.