दुबई : सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी न्यूझीलंड संघाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने किवींवर 6 विकेट राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानचा हा सलग 11 वा ट्वेंटी-20 मालिका विजय आहे. 2016च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानने एकही ट्वेंटी-20 मालिका गमावलेली नाही. 2018मध्ये पाकिस्तानने 16 ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचाही पराक्रम केला आणि या कामगिरीसह त्यांनी भारताचा विक्रमही मोडला आहे.
एका वर्षात 16 ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा पाकिस्तान पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी भारताच्या 15 विजयांचा विक्रम मोडला. भारताने 2016 मध्ये 21 पैकी 15 ट्वेंटी-20 सामने जिंकले होते. पाकिस्तानने यावर्षी 17पैकी 16 सामन्यांत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे यातील 11 विजय हे धावांचा पाठलाग करतानाचे आहे. ट्वेंटी-0 मालिकांच्या बाबतीत पाकिस्तानने 11 विजयांची नोंद केली आहे. याही विक्रमात त्यांनी भारताला पिछाडीवर टाकले आहे. भारताने 9 मालिकेत विजय मिळवले आहेत, तर 2 मालिका गमावल्या आहेत.
सर्फराजला सप्टेंबर 2016 मध्ये कर्णधाराची जबाबदारी दिली. त्यानंतर पाकिस्तानने इंग्लंड ( 1-0), वेस्ट इंडिज (3-0 आणि 3-1), जागतिक एकादश ( 2-1), श्रीलंका ( 3-0),
न्यूझीलंड ( 2-1), वेस्ट इंडिज (3-0), स्कॉटलंड (2-0) आणि ऑस्ट्रेलिया (3-0) यांना पराभूत केले.
Web Title: Sarfraz Ahmed and Co surpass India to register 'record' number of T20I wins in a year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.