कसोटीच्या १४६ वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम सौद शकिलने केला; गावस्करांचा विक्रम मोडला

SL vs PAK 2nd Test : पाकिस्तानने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसऱ्या कसोटीतही त्यांचे पारडे जड झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 01:42 PM2023-07-26T13:42:21+5:302023-07-26T13:51:19+5:30

whatsapp join usJoin us
Saud Shakeel is the first batter in 146 years history of Test history to score a 50 in each of the first 7 Test matches | कसोटीच्या १४६ वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम सौद शकिलने केला; गावस्करांचा विक्रम मोडला

कसोटीच्या १४६ वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम सौद शकिलने केला; गावस्करांचा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs PAK 2nd Test : पाकिस्तानने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसऱ्या कसोटीतही त्यांचे पारडे जड झाले आहे. श्रीलंकेचा पहिला डाव १६६ धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तानने ४ बाद ३२८ धावा करून १६२ धावांची आघाडी घेतली आहे. अब्दुल्लाह शफिकने १५९ धावांची खेळी करून पाकिस्तानला ही मोठी आघाडी मिळवून दिली. पण, सौद शकिलने ( Saud Shakeel) तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात एकाही फलंदाजाला अगदी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनाही हा पराक्रम जमलेला नाही.


सौद शकिलने तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावला आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या सात सामन्यांत अर्धशतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. सुनील गावस्कर, बसील बुचर, सईद अजमल आणि बेर्ट सुटक्लिफ यांनी सलग सहा सामन्यांत अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. ३ बाद २१० अशी पाकिस्तानची धावसंख्या असताना शकिल फलंदाजीला आला. त्याने अब्दुल्लाह शफिकसोबत चांगली भागीदारी करून पाकिस्तानला तीन आकडी आघाडी मिळवून दिली.


२७ वर्षीय शकिलने आज वर्ल्ड रेकॉर्ड केला. पहिल्या कसोटी त्याने नाबाद २०८ धावा करून विक्रम नोंदवला होता. श्रीलंकेतील पाकिस्तानी खेळाडूची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी मोहम्मद हाफिजने १९६ धावा केल्या होत्या. परदेशातील पहिल्याच कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पाकिस्तानचा ( झहीर अब्बास वि. इंग्लंड, १९७१) दुसरा फलंदाज ठरला.  


शकिलची मागील ७ कसोटींमधील कामगिरी
पहिली कसोटी - ७६ धावा
दुसरी कसोटी - ६३ व ९४  धावा
तिसरी कसोटी - ५३  धावा
चौथी कसोटी - ५५* धावा
पाचवी कसोटी - १२५ * धावा
सहावा कसोटी - २०८* धावा
सातवी कसोटी - ५७ धावा 

Web Title: Saud Shakeel is the first batter in 146 years history of Test history to score a 50 in each of the first 7 Test matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.