Join us  

IPL मध्ये ४१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सौदी अरेबियाचा प्रस्ताव, मोदी सरकार निर्णय घेणार 

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला IPL मधून बक्कळ कमाई होते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 4:52 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे... जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला IPL मधून बक्कळ कमाई होते आणि त्याचा वापर ते देशांतर्गत क्रिकेटच्या विकासासाठी करतात. आता त्यांना आणखी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग ( EPL) प्रमाणे सौदी अरेबिया आता आयपीएलमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक करण्यासाठी तयार आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

आयपीएल २०२४ची तयारी आतापासून सुरू झाली आहे आणि १८ किंवा १९ डिसेंबरला सौदी अरेबियात खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी सर्व १० फ्रँचायझींना त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे आयपीएलकडे नोव्हेंबर अखेरीस द्यायची आहेत. त्यात आता सौदी अरेबियाच्या प्रस्तावामुळे आयपीएल अधिक ग्लोबल होणार आहे. पण, या प्रस्तावावर भारतीय सरकार २०२४च्या लोकसभा निडणुकीनंतर बीसीसीआयशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा अंदाज आहे. 

सौदी अरबच्या गुंतवणुकीमुळे इंग्लिश प्रीमिअर लीग ग्लोबल झाल्याचा दाखला देण्यात येत आहे. ही डिल झाल्यास पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी आयपीएलचे दरवाजे उघडले जातील असेही सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२३सौदी अरेबिया