मुंबई : कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांना चांगलीच महागात पडली आहेत. आता त्यांच्यावर आता बीसीसीआय कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. एकिकडे बीसीसीआय कडक भूमिका घेत असताना याप्रकरणी भारताचा माजी कर्णधाराने मात्र पंड्या आणि राहुलचे समर्थन केले आहे. बीसीआयने कडक कारवाई करण्याचे ठरवले तर हार्दिक पंड्याला विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात पंड्या आणि राहुल यांनी आपल्याला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्री आवडतात आणि आपल्याला कोणाबरोबर लग्न करायला आवडेल, यावर भाष्य केले होते. या साऱ्या प्रकारानंतर बीसीसीआयने या दोघांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या दोघांनाही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून भारतात यावे लागले आहे. आता बीसीसीआयची एक समिती पंड्या आणि राहुल यांची चौकशी करणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल बीसीसीआयला सादर करेल आणि त्यानंतर या दोघांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
सौरव गांगुली याबद्दल म्हणाला की, " माणसांकडून चुका होता. पण या चुकांमधून बोध घ्यायला हवा. जर एखाद्याने चुक केली असेल आणि त्याला ती उमगली असेल तर तो चांगला माणूस होऊ शकतो. सरतेशेवटी आपण माणसं आहोत, मशिन्स नाही. त्यामुळे माणसांकडून चुका होत असतात. आपण जगत असताना दुसऱ्यालाही जगवायला हवं. "
पाहा हा खास व्हिडीओ
हार्दिकनं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं
हार्दिककडे आता ब्रँड्सनेही पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर खार जिमखानाने त्याचे मानद सदस्यत्व रद्द केले. हार्दिकच्या अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आहे आणि तो कोणाचे फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले,''ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचं वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र, आता तो घरी असूनही सण साजरा करत नाही.''
Web Title: SAURAV GANGULLY TOOK SIDE OF HARDIK PANDYA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.