गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."

कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:34 PM2024-08-22T19:34:21+5:302024-08-22T19:34:29+5:30

whatsapp join usJoin us
Saurav Ganguly's wife Dona Ganguly and daughter Sana Ganguly expressed displeasure over Kolkata doctor case  | गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."

गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

kolkata doctor case : कोलकाता येथे ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने देखील याप्रकरणी बोलताना संताप व्यक्त केला. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. गांगुलीच्या कुटुंबीयांनी लाँग मार्चमध्ये सहभागी होत निषेध व्यक्त केला.

सौरव गांगुलीसह त्याची पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली उपस्थित होती. डोना गांगुलीने सांगितले की, आम्हाला न्याय हवा आहे. अत्याचाराच्या घटनांना आळा बसलाच पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशा घटना घडत असल्या तरी त्या थांबल्याच पाहिजेत. दररोज अशा घटनांबद्दल ऐकून खूप दु:ख होते. २०२४ मध्येही अशा घटना घडत आहेत हे दुर्दैव. मी कोलकातात जास्त वास्तव्यास नसते... पण हे माझे घर आहे. अशा वाईट प्रवृत्तींना ठेचायलाच हवे.

गांगुलीची लेक सना गांगुलीने देखील तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध केला. काहीही झाले तरी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत न्याय हवा आहे. आपण दररोज कोणत्या ना कोणत्या बलात्काराच्या घटना ऐकतो. मला वाईट वाटते की हे २०२४ मध्येही होत आहे, असे सना गांगुलीने नमूद केले. 


 
कोलकाता येथील घटना म्हणजे अंगावर काटा आणणारे एक वाईट स्वप्नच. मृत महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती. गळा दाबला गेला, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून डोळ्यात घुसला. (kolkata murder case doctor) विशेष बाब म्हणजे असे असताना देखील संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे रुग्णालयाने मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना सांगितले. आत्महत्येचे कारण खुद्द डॉक्टर घोष यांनी दिल्याचा आरोप आहे. (kolkata murder case girl) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉ. घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले, पण ते गेले नाहीत. अखेर १६ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. 

Web Title: Saurav Ganguly's wife Dona Ganguly and daughter Sana Ganguly expressed displeasure over Kolkata doctor case 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.