नवी दिल्ली : भारत अणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीपूर्वी राजकोटमध्ये आपला पिच क्युरेटर पाठविण्याचा बीसीसीआयचा निर्णय सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एससीए) माजी दिग्गज अधिकारी निरंजन शाह यांना आवडलेला नाही. दरम्यान, बीसीसीआयचा हा निर्णय ‘दर्जा प्रकिया’ असल्याचे मानले जात आहे.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेसह सुमारे चार दशके जुळलेले शाह म्हणाले, स्थानिक क्युरेटर चांगली खेळपट्टी बनविण्यास सक्षम आहेत. शाह लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट संघटनेच्या कुठल्याही पदावर नाहीत. बीसीसीआयचे क्युरेटर दलजीत सिंग व विश्वजित पडयार यांनी राजकोट मैदानाचा ताबा घेतल्यानंतर शाह यांची प्रतिक्रिया आलेली आहे.
शाह म्हणाले, ‘स्थानिक क्युरेटर स्वतंत्रपणे आपले कार्य करू शकतो, पण आता बीसीसीआयचे क्युरेटर येथे असून खेळपट्टीचे सर्व निर्णय ते घेतील. एससीएचे कर्मचारी त्यांच्या मदतीला असतील. कारण त्यांना स्थानिक परिस्थितीची अधिक माहिती नसून त्यांचा सल्ला घेतला जाईल, अशी आशा आहे.’एका सीनिअर क्युरेटरने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलेय ‘हा वाद माझ्या समजण्यापलिकडचा आहे. बीसीसीआयचे क्युरेटर स्थानिक मैदान कर्मचाऱ्यांची मदत करतात आणि खेळपट्टी तयार करण्याची ही दर्जा प्रकिया आहे. एससीएला याबाबत काय अडचण आहे, याची मला कल्पना नाही. ही नेहमीची प्रक्रिया आहे. रणजी ट्रॉफीदरम्यानही या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो. त्यामुळे नक्की वादाचा मुद्दा काय आहे, हे मला कळले नाही.’ (वृत्तसंस्था)दहा दिवसांनी आॅस्ट्रेलियात टी२० सामनावेस्ट इंडिज संघाचा भारत दौरा ११ नोव्हेंबरला संपणार आहे आणि आॅस्ट्रेलियात भारताला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळायचा आहे. दोन्ही लढतींदरम्यान केवळ १० दिवसांचे अंतर आहे.प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड दौºयात कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर म्हटले होते की, ‘केवळ १० दिवसांमध्ये संघाची तयारी करणे कठीण काम आहे.’ राजकोट मैदानावरील हा दुसरा कसोटी सामना राहील. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने येथे अनिर्णीत लढत खेळली होती.