वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे आणि शुक्रवारी धडकी भरवणारा प्रसंग मैदानावर घडला. १० मिनिटांच्या कालावधीत वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळले अन् त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. इतकेच नव्हे, तर अॅम्ब्यूलेन्स बोलावून त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या खेळाडूंना नेमकं काय झालं? ते का अचानक कोसळले? याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. दोन्ही खेळाडूंवर सध्या उपचार सुरू आहेत.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान महिला यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना सुरू होता. पाकिस्तानी महिला संघाची फलंदाजी सुरू असताना वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू १० मिनिटांच्या अंतरानं चक्कर येऊन मैदानावर कोसळले. यापैकी एका खेळाडूचं नाव आलिया एलिन (Aaliyah Alleyne) असे आहे, तर दुसरीचं नाव चेडियन नेशन (Chedean Nation) असे आहे. या दोघींची प्रकृती एवढी चिंताजनक होती की त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
वेस्ट इंडिज संघानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १२५ धावा केल्या होत्या. त्यात चेडियन नेशननं ३३ चेंडूंत २८ धावा केल्या होत्या. तर एलिन दोन धावा करून नाबाद राहिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या डावात पावसानं खोडा घातला. पाऊस थांबल्यानंतर सुरू झालेल्या खेळात पाकिस्ताननं १८ षटकांत ६ बाद १०३ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले आणि यासह विंडीजनं दोन सामन्यांची मालिका २-० असी जिंकली.
Read in English
Web Title: Scary scenes : West Indian player Chinelle Henry and Chedean Nation has collapsed during 2nd T20I against PAKW
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.