ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

ICC WC2023 Schedule Updated : झिम्बाब्वेत पार पडलेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन संघांनी भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:10 PM2023-07-13T19:10:00+5:302023-07-13T19:10:20+5:30

whatsapp join usJoin us
Schedule for ICC ODI World Cup 2023 updated after Qualifier in Zimbabwe, check team India full timetable  | ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC WC2023 Schedule Updated : झिम्बाब्वेत पार पडलेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन संघांनी भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश मिळवला. श्रीलंकनेने क्वालिफायर फायनलमध्ये नेदरलँड्सवर विजय मिळवला आणि मुख्य स्पर्धेत त्यांचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे आणि ९ नोव्हेंबरला त्यांचा शेवटचा साखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे होईल.  


पात्रता स्पर्धेत नेदरलँड्स उपविजेते राहिले आणि मुख्य स्पर्धेत पहिला सामना ६ ऑक्टोबरला हैदराबाद येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील हा संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना ११ नोव्हेंबरला बंगळुरू येथे भारताविरुद्ध खेळेल. ५ ऑक्टोबरला या स्पर्धेला गतविजेता इंग्लंड आणि गतउपविजेता न्यूझीलंड यांच्या लढतीने या स्पर्धेची सुरूवात होईल. पहिली सेमी फायनल १५ नोव्हेंबरला मुंबईत आणि त्याच दिवशी दुसरी कोलकाता येथे होईल. दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होईल.   

ICC WC2023 Schedule Updated

  • ५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. न्यूझीलंड, अहमदाबाद
  • ६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. नेदरलँड्स, हैदराबाद
  • ७ ऑक्टोबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला
  • ७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका, दिल्ली
  • ८ ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
  • ९ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. नेदरलँड्स, हैदराबाद
  • १० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला
  • ११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
  • १२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका, हैदराबाद
  • १३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ
  • १४ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान, दिल्ली
  • १४ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई
  • १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
  • १६ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, लखनौ
  • १७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स, धर्मशाला
  • १८ ऑक्टोबर - न्यूझिलंड वि. अफगाणिस्तान, चेन्नई
  • १९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
  • २० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
  • २१ ऑक्टोबर - इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई
  • २१ ऑक्टोबर - नेदरलँड्स वि. श्रीलंका, लखनौ
  • २२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
  • २३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई
  • २४ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई
  • २५ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड्स, दिल्ली
  • २६ ऑक्टोबर - इंग्लंड वि. श्रीलंका, बंगळुरू
  • २७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
  • २८ ऑक्टोबर- नेदरलँड्स वि. बांगलादेश, कोलकाता
  • २८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड, धर्मशाला
  • २९ ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड, लखनौ
  • ३० ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. क्वालिायर २, पुणे
  • ३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
  • १ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे
  • २ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई
  • ३ नोव्हेंबर - नेदरलँड्स वि. अफगाणिस्तान, लखनौ
  • ४ नोव्हेंबर - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद
  • ४ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
  • ५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • ६ नोव्हेंबर - बांगलादेश वि. श्रीलंका, दिल्ली
  • ७ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, मुंबई
  • ८ नोव्हेंबर - इंग्लंड वि. नेदरलँड्स, पुणे
  • ९ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर २, बंगळुरू
  • १० नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद
  • ११ नोव्हेंबर - भारत वि. नेदरलँड्स, बंगळुरू
  • १२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता
  • १२ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे
  • १५ नोव्हेंबर - पहिली सेमी फायनल, मुंबई
  • १६ नोव्हेंबर - दुसरी सेमी फायनला, कोलकाता
  • १९ नोव्हेंबर - फायनल, अहमदाबाद 

Web Title: Schedule for ICC ODI World Cup 2023 updated after Qualifier in Zimbabwe, check team India full timetable 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.