नवी दिल्ली : लवकरच लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या आयोजकांनी मंगळवारी आगामी दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १६ सप्टेंबरपासून सहा शहरांमध्ये खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये कोलकाता, नवी दिल्ली, कटक, लखनौ आणि जोधपूर या शहरांचा समावेश आहे. तर प्लेऑफचे ठिकाण अद्याप जाहीर झाले नाही.
१६ तारखेला होणार विशेष सामना दरम्यान, १६ सप्टेंबरला इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स यांच्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष सामना खेळवला जाणार आहे. हा विशेष सामना कोलकातामध्ये पार पडेल. १७ सप्टेंबरपासून लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) लीगला सुरुवात होते आहे.
डेहराडूनमध्ये होऊ शकतो अंतिम सामना लीजेंड्स लीग क्रिकेट लीगचे संस्थापक आणि सीईओ रमन रहेजा यांनी सांगितले, "या सत्रातील फायनलच्या सामन्यासाठी आम्ही डेहराडूनकडे पाहत आहोत. तसेच आम्ही क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी या अप्रतिम क्रिकेट मैदानावर येत आहोत, असे लिजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्री यांनी म्हटले.
लीजेंड्स लीगच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक -
- कोलकाता - १६ ते १८ सप्टेंबर
- लखनौ - २१ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर
- नवी दिल्ली - २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर
- कटक - २७ ते ३० सप्टेंबर
- जोधपूर - १ आणि ३ ऑक्टोबर
- प्ले-ऑफ - ५ आणि ७ ऑक्टोबर - स्थळ घोषित झाले नाही.
- ८ ऑक्टोबरला अंतिम सामना
इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुली ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.
रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.