नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर झाले असून १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. खरं तर अहमदाबाद येथे खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानला नमते घ्यावे लागले आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या पाच ठिकाणी पाकिस्तानी संघ सामने खेळणार आहे.
ICC 2023 World Cup knockouts schedule -
- उपांत्य फेरी १ - मुंबई - १५ नोव्हेंबर.
- उपांत्य फेरी २ - कोलकाता - १६ नोव्हेंबर.
- अंतिम सामना - अहमदाबाद - १९ नोव्हेंबर.
१० ठिकाणांवर विश्वचषकातील ४८ सामने खेळवले जाणार आहेत. १२ वर्षानंतर प्रथमच भारतात ही मोठी स्पर्धा खेळवली जात आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी मुंबई व कोलकाता यांची निवड केली गेली आहे, तर फायनल अहमदाबाद येथे होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक ( Pakistan WC Schedule)
- ६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
- १२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
- १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
- २० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
- २३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
- २७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
- ३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
- ४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
- १२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता