भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाहण्यासाठी आतुरलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांना उभय संघ वन डे सामन्यात एकमेकांसोर उभे ठाकलेले पाहायला मिळणार आहे. दोन्ही देशांतील तणावाचे संबंध पाहता द्विदेशीय मालिका होणे अश्यक्यच आहे, परंतु आयसीसीच्या स्पर्धेत या संघाना विरोधात खेळताना पाहण्याची संधी कोणताही दर्दी क्रिकेटचाहता सोडू इच्छित नाही. नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाक संघाची धुळधाण उडवली होती. आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाक समोरासमोर येणार आहेत.
आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशियाई चषक वन डे स्पर्धेसाठीचं वेळापत्रक रविवारी जाहीर केले. पण, ही स्पर्धा पुरुष क्रिकेटपटूंची नव्हे, तर महिला संघांसाठीची आहे. 'Women’s Emerging Asia Cup' असे या स्पर्धेचे नाव आहे आणि यात भारत व पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका व बांगलादेश या संघांचाही समावेश आहे. 22 ते 27 ऑक्टोबर 2019 या कालावधीत ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडेल आणि अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे.
असे असेल वेळापत्रक22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश22 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध श्रीलंका23 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान24 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश27 ऑक्टोबर - अंतिम सामना
भारतीय संघदेविका वैद्य ( कर्णधार). एस मेघना, यस्तिका भाटीया, तेजल हसब्नीस, तनुश्री सरकार, सिमरन दिल बहादूर, नुझात परवीन, आर कल्पना, मनाली दक्षिणी, क्षमा सिंग, अंजली सारवानी, मिनू मणी, सुश्री दिब्यादर्शीनी, टीपी कनवार, राशी कनोजिया