जोश इंग्लिस याने केलेल्या विक्रमी फास्टर सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्कॉटलंडचा बुक्का पाडला. दुसऱ्या टी-२० सामन्यातील ७० धावांनी मिळवलेल्या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची टी-२० मालिका अगदी आरामात खिशात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद टी-२० शतक जोश इंग्लिस याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद टी-२० शतक झळकवण्याचा पराक्रम या सामन्यात केला. त्याने ४९ चेंडूत ७ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार ठोकत १०३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना यजमान संघ १६.४ षटकांत अवघ्या १२६ धावांवर आटोपला.
ग्लेन मॅक्सवेलला टाकले मागे
ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगवान शतक करण्याचा आधीचा रेकॉर्ड हा ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिश याच्या नावेच होता. दोघांनी २०२३ च्या भारत दौऱ्यावर ४७ चेंडूत शतक साजरे केले होते. जोश इंग्लिस याने विशाखापट्टणमच्या मैदानात तर मॅक्सवेलनं गुवाहटीच्या मैदानात फास्टर सेंच्युरी नोंदवली होती. पण आता स्कॉटलंड विरुद्धच्या ४३ चेंडूतील शतकी खेळीसह जोस इंग्लिश याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा नंबर वन बॅटर ठरलाय. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके झळकवण्याच्या बाबतीत५ शतकासह मॅक्सवेलच टॉपला आहे.
रोहितच्या विक्रमाला नाही लागला धक्का
स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात जोस इंग्लिस एकदम जोशमध्ये दिसला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद टी-२० शतकही त्याच्या नावे झाले. पण रोहित शर्मासह किलर मिलरचा विक्रम काही तो मोडीत काढू शकला नाही. एवढेच नाही तर त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच खेळाडूंमध्येही स्थान मिळवता आले नाही.
टी -२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड
आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा भारतीय वंशाचा एस्टोनियन क्रिकेटर साहिल चौहानच्या नावे आहे. १७ जून २०२४ रोजी सायप्रस संघाविरुद्ध झालेल्या लढतीत त्याने अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नामिबियाच्या यान निकोल लोफ्टी-ईटन याचा नंबर लागतो. त्याने नेपाळ विरुद्ध २७ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या लढतीत ३३ चेंडूत शतक झळकावले होते.
२७ सप्टेंबर २०२४ रोजी नेपाळच्या कुशल मल्लानं मंगोलिया विरुद्धच्या सामन्यात ३४ चेंडूत शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं २९ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत शतक झळकावले होते. याच वर्षी रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत ३५ चेंडूत शतक ठोकले होते. या यादीत जोस इंग्लिश १८ व्या स्थानावर आहे.