Join us  

११ Six, ४ Four! सहाव्या क्रमांकावर आला अन् ३४ चेंडूंत शतक ठोकून इतिहास घडवला, Video 

शुबमन गिलच्या शतकाची भारतात चर्चा होत असताना इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमधील चौथे जलद शतक झळकले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 3:11 PM

Open in App

शुबमन गिलच्या शतकाची भारतात चर्चा होत असताना इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमधील चौथे जलद शतक झळकले गेले. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे चौथे सर्वात वेगवान शतक आहे. सीन अॅबॉटने ( Sean Abbott) ट्वेंटी-२० लीग व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये सहाव्या क्रमांकावर येऊन विक्रमी खेळी केली.  सरे आणि केंट यांच्यातल्या सामन्यात हे शतक झळकले.  या सामन्यात सरे संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅबॉटने सहाव्या क्रमांकावर येऊन दमदार फटकेबाजी केली.  

सरेची टॉप ऑर्डर या सामन्यात अपयशी ठरली. अव्वल पाच फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाने २० धावांचा आकडा गाठला नाही. त्यामुळे १३व्या षटकापर्यंत त्यांची धावसंख्या १०० पर्यंतही नाही पोहचली आणि ५ फलंदाज डगआउटमध्ये बसले. सरेच्या टॉप ऑर्डरच्या शरणागतीनंतर केंटच्या संघाला आपला विजय जवळपास निश्चित दिसू लागला असेल. मात्र त्यांच्या योजनेवर पाणी फेरण्याचे काम सहाव्या क्रमांकावर आलेल्या अॅबॉटने केले. अॅबॉटने क्रीझवर पाऊल ठेवताच त्याने बॅट स्विंग करायला सुरुवात केली आणि काही वेळातच परिस्थिती वळायला लागली.

अॅबॉटने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, जे ट्वेंटी-२० मधील चौथे जलद शतक आहे. त्याने अँड्र्यू सायमंड्सच्या विक्रमाची बरोबरी केली. ३० चेंडूत ख्रिस गेलच्या नावावर ट्वेंटी-२० मध्ये सर्वात जलद शतक आहे, तर रिषभ पंतच्या नावावर ३२ चेंडूत दुसरे जलद शतक आहे. अॅबॉटची पूर्ण खेळी ४१चेंडूंची होती, ज्यात त्याने नाबाद ११० धावा केल्या. त्याने ११ षटकार आणि ४ चौकार मारले.

अॅबॉटने क्लार्कसोबत सहाव्या विकेटसाठी अवघ्या ४६ चेंडूत १२९ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सरेने २० षटकांत २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात केंटचा संघ ७ बाद १८७ धावा करू शकला आणि ४१ धावांनी सामना गमावला.

टॅग्स :टी-20 क्रिकेटआॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App