ठळक मुद्देआयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील किवी संघानं विराट कोहलीच्या टीम इंडियावर विजय मिळवून हे जेतेपद नावावर केले.
Everything you need to know about World Test Championship 2021-23 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील किवी संघानं विराट कोहलीच्या टीम इंडियावर विजय मिळवून हे जेतेपद नावावर केले. आता भारतीय संघ कसोटी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाला आहे आणि बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. पहिल्या पर्वातील काही चुका सुधारत आयसीसीनं दुसऱ्या पर्वासाठी WTC नियमांत काही बदल केले आहेत.
India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ ( ICC World Test Championship 2021-23) च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( second cycle of the World Test Championship) दुसरे पर्वही सुरू होत आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत WTC स्पर्धेचे दुसरे पर्व होणार असून यात भारत-इंग्लंड आणि अॅशेस या दोन मालिका पाच सामन्यांच्या आहेत. ( The second edition of the ICC World Test Championship begins this week with the highly anticipated five-match series between England and India)
India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!
WTC च्या दुसऱ्या पर्वाच्या कालावधीत इंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत ( 19), ऑस्ट्रेलिया ( 18) आणि दक्षिण आफ्रिका ( 15) यांना सर्वाधिक कसोटी सामने खेळता येणार आहेत. WTCच्या पहिल्या पर्वातील विजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला 13 कसोटी सामने आहेत. त्याच्यासोबत वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या वाट्याला 13 सामने आहेत. पाकिस्तान 14 सामने खेळणार आहेत, तर बांगलादेश 12 सामने खेळतील. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर आहे आणि तेथे चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयसीसीनं अद्याप फायनल कुठे खेळवली जाईल, हे निश्चित केलेले नाही.
कशी असेल नवीन Points System
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण दिले जाणार आहेत. या गुणांसोबतच टक्केवारीही ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के दिले जाणार आहेत. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे.
Web Title: The second edition of the ICC World Test Championship begins with England vs India test series starting from tomorrow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.